शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 21:20 IST

हे चोरटे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका गोडाउनमधून तब्बल १६ लाख रुपयांच्या सिगारेटस्सह मुद्देमाल पळविणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला बुधवारी यश आले. चोरट्यांच्या टोळीने राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात मोठ्या चो­ºया केल्याची माहिती समोर आली आहे. हे चोरटे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गोडाउनमधून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असलेल्या चोरट्यांच्या टोळीने १६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. याप्रकरणी गोडउन मालकाने दिलेल्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या चोरट्यांची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाल्यानंतर त्यांनी एक महिन्यापासून या चोरट्यांवर पाळत ठेवून त्यांना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून ताब्यात घेतले. यामध्ये
अकबर खान ऊर्फ अवघड चोरवा हबीब खान वय ३२ वर्षे सय्यद हुसेन ऊर्फ सोनू सय्यद हबीब वय २१ वर्षे व जुममन शाह सुलेमान शाह ३३ वर्ष तिघेही राहणार मालेगाव जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता तीनही चोरट्यांनी १६ लाख ८० हजार रुपयांच्या सिगारेटसह मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या तीनही चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही चोरट्यांना ३0 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चोरट्यांनी गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात मोठ्या चो­ºया केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, जयंता सोनटक्के, अश्विन मिश्रा, शक्ती कांबळे ,किशोर सोनवणे, वसीमउद्दीन शेख, विशाल मोरे, लीलाधर खंडारे यांनी केली. त्यांना सायबर पथकाने तांत्रिक मुद्द्याचे सहकार्य केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी