वृध्दांना मिळणार वाढीव अनुदान

By Admin | Updated: July 20, 2015 23:07 IST2015-07-20T23:07:22+5:302015-07-20T23:07:22+5:30

लाभार्थ्यांंचे होणार फेरसर्वेक्षण.

Incremental grant to the elderly | वृध्दांना मिळणार वाढीव अनुदान

वृध्दांना मिळणार वाढीव अनुदान

बुलडाणा : संजय गांधी निराधार, इंदिरा वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांंंंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यापृष्ठभूमिवर राज्यातील लाभार्थ्यांंंंची नेमकी आकडेवारी मिळावी, यासाठी लाभार्थ्यांंंंचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने १८ जुलै रोजी घेतला. वृद्धांसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात; मात्र या योजनेच्या लाभार्थी संख्येमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत बर्‍याच जिल्ह्यांमध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे खर्‍या लाभार्थ्यांंंंना आर्थिक मदत करण्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात येत आहे. यातून २0१५-१५ आर्थिक वर्षातील जून ते नोव्हेंबर महिन्याचे वाढीव अनुदान लाभार्थ्यांंंंना मिळणार आहे. राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी २६ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपये, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ नवृत्तीवेतन योजनेसाठी ९ कोटी ९७ लाख ६६ हजार रुपयाची तरतूद करण्यात आली असून सहा महिन्यांच्या कालावधीत ही रक्कम विविध लाभार्थ्यांंना वाटप करण्यात येणार आहे.

*जिल्हाधिका-यांना आदेश

           योजनेची रक्कम प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांकडे सुपुर्द करण्यात आली आहे. त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील तालुक्यांची खरी लाभार्थी संख्या प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार त्यांना हा निधी वाटप करण्यात येणार आहे.

Web Title: Incremental grant to the elderly