शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

शेती पिकांचा चुकीचा सर्व्हे करणे भोवले

By admin | Updated: August 21, 2014 00:40 IST

नदीपासून तब्बल २ किलोमीटरच्या अंतरावर शेत असलेल्या शेतकर्‍यांची पात्र लाभार्थींच्या यादीत नियमबाह्यरीत्या नावे समाविष्ट करीत तलाठय़ांनी त्यांना लाभान्वित केले.

आकोट : शेती पिकांच्या नुकसानीबाबत सर्व्हे करताना नदीपासून तब्बल २ किलोमीटरच्या अंतरावर शेत असलेल्या शेतकर्‍यांची पात्र लाभार्थींच्या यादीत नियमबाह्यरीत्या नावे समाविष्ट करीत तलाठय़ांनी त्यांना लाभान्वित केले. त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवीत हनवाडी (पारळा) येथील तलाठी आर. व्ही. बोकाडे यांना निलंबित करण्यात आले. एसडीओ शेलेश हिंगे यांनी निलंबनाचे आदेश काढले असून, बोकाडे यांना चुकीचा सर्व्हे करणे चांगलेच भोवले आहे. हनवाडी (पारळा) येथे पुरामुळे नदीकाठावरील शेती खरवडून गेली होती. नुकसानग्रस्त शेती पिकांचा सर्व्हे करत असताना तलाठी बोकाडे यांनी पात्र लाभार्थींना डावलून नदीपासून अंतरावर दोन किलोमीटर शेत असलेल्या २९ शेतकर्‍यांना ५0 टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या यादीत समाविष्ट केले होते. या प्रकाराबाबत पात्र लाभार्थींनी जिल्हाधिकारी, एसडीओ, तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली होती. तसेच विधानसभेतसुद्धा लाभार्थींच्या बोगस यादीची चौकशी करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर मंत्रालयातून निघालेल्या चौकशीच्या आदेशावरून आकोटचे नायब तहसीलदार गीते व मंडळ अधिकारी एन. डी. पवार यांनी जंगल नकाशाच्या आधारे पूरग्रस्त शेतीची संयुक्त पाहणी केली. यामध्ये तलाठी बोकाडे यांनी अधिकाराचा दुरुपयोग करीत पात्र लाभार्थींना वंचित ठेवून बोगस सर्व्हे केला असल्याचे समोर आले. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत मुख्यालयी गैरहजर राहणे, कार्यालयाने दिलेल्या कारणे दाखवा नोटीसचे स्पष्टीकरण न करणे, ग्रामसभा न घेता राष्ट्रीय अन्न सुरक्षा यादीमध्ये मनमानी करीत नावे समाविष्ट करणे यासह विविध आक्षेपीय मुद्यांच्या आधारे तलाठी बोकाडे यांना चौकशीअंती निलंबित करण्याचे आदेश एसडीओ शैलेश हिंगे यांनी दिले.