शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात कोरोनासह ‘सारी‘चाही शिरकाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:10 IST

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट बसला असताना ‘सारी’ (सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) या आजाराचाही शिरकाव झाला आहे. कोरोना ...

अकोला: जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट बसला असताना ‘सारी’ (सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) या आजाराचाही शिरकाव झाला आहे. कोरोना आणि सारीची लक्षणे जेमतेम सारखीच असल्याने अकोलेकरांनी आता विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.मागील सहा महिन्यांपासून कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. कोरोना बाधितांचा आकडा सहा हजाराच्या पार गेला असून, मृत्यूचाही आकडा वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवणे अशक्य होत असताना जिल्ह्यात ‘सारी’ या आजाराचाही शिरकाव झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना आणि सारीची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे सारीच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी केली जाते. ही चाचणी निगेटिव्ह येताच सुटकेचा नि:स्वास सोडला जात आहे; मात्र निगेटिव्ह अहवाल आलेले सारीचे रुग्णही मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एप्रिल ते जून या कालावधीत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनासह सारीमुळेदेखील रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अहवाल निगेटिव्ह आला तरी रुग्णांनी वेळीच खबरदारी घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचारास सुरुवात करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

ही आहेत लक्षणे

  • एकदम सर्दी येणे
  • तापाचे प्रमाण जास्त
  • खूप अशक्तपणा
  • न्यूमोनिया
  • श्वसन दाह
  • छातीत दुखणे
  • रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे

यांना सर्वाधिक धोका

  • लहान मुले
  • ज्येष्ठ नागरिक
  • कमी प्रतिकारशक्ती असणाºया व्यक्ती
  • मधुमेह
  • हृदयरोग असलेली व्यक्ती
  •  

रुग्णसंख्या स्पष्ट नाहीजिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना सारीचाही शिरकाव झाला. याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहितीदेखील दिली; मात्र आतापर्यंत सारीचे किती रुग्ण आढळले, याबद्दल वैद्यकीय अधिकारी बोलण्यास टाळत आहेत. कोरोना निगेटिव्ह अहवालातील गंभीर असलेले रुग्ण हे सारीचे असल्याचा दुजोरा वैद्यकीय अधिकाºयांकडून दिला जात असला, तरी रुग्णांची नेमकी आकडेवारी देण्यास टाळत आहेत.

जिल्ह्यात सारीसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आवश्यक खबरदारी घ्यावी.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य