आयजीपीच्या वार्षिक निरीक्षणास सुरुवात

By Admin | Updated: September 10, 2014 01:20 IST2014-09-10T01:20:49+5:302014-09-10T01:20:49+5:30

रामदासपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षण.

IGP's annual inspection begins | आयजीपीच्या वार्षिक निरीक्षणास सुरुवात

आयजीपीच्या वार्षिक निरीक्षणास सुरुवात

अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांच्या ४ ते ९ सप्टेंबरदरम्यान वार्षिक निरीक्षणास सुरुवात झाली आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिस कामाला लागले आहेत. आयजीपी यांच्या दौर्‍यानिमित्त पोलिस ठाणेनिहाय आढावा घेण्यासाठी पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी ठाणेदारांची बैठकसुद्धा घेतली. आयजीपी यांच्या चमूमार्फत मंगळवारी रामदासपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षण करण्यात आले.
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून जिल्हय़ातील पोलिस दलाच्या कामकाजाचे वार्षिक निरीक्षण करण्यात येते. यावर्षी जिल्हय़ातील १६ पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारीं माहिती गोळा करण्यात गुंतले आहेत. आयजीपी बिपीन बिहारी हे पोलिस परेडचेसुद्धा निरीक्षण करणार असल्याने पोलिस मुख्यालयात पोलिस कवायत करण्यात येत आहे.

Web Title: IGP's annual inspection begins