शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मैं नहीं तुही, असेच संघ स्वयंसेवकांचे कार्य : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST

सरसंघचालक भागवत म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिक्षण घेतानाच, शंकरलाल खंडेलवाल यांच्याशी संपर्क आला. एका सामान्य कार्यकर्त्यांसोबत संपर्क, ...

सरसंघचालक भागवत म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिक्षण घेतानाच, शंकरलाल खंडेलवाल यांच्याशी संपर्क आला. एका सामान्य कार्यकर्त्यांसोबत संपर्क, ओळख करण्याची शैली भावनिक होती. संघ कार्यासोबतच मी खंडेलवाल कुटुंबीयांशी कायम जोडला गेलो. अकोल्यात संघाचा प्रचारक म्हणून काम करताना, शंकरलालजी, गीतादेवी यांनी स्नेह दिला. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. सर्व समाजाला सोबत घेवून आणि ध्येयाप्रती सजग राहून, शंकरलाल खंडेलवाल यांनी संघ कार्यासोबत सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्य केले. काम करताना, त्यांना अहंकार कधीही शिवला नाही. यशस्वी लोकांचे म्हणूनच, अनेकजण अनुकरण करतात. समाजासाठी उदाहरणस्वरूप आचरण प्रेरणादायी असे सांगत, त्यांनी शंकरलालजी हे धार्मिक पुरुष होते. संघ, जनसंघ, जनता पार्टीचे काम करताना, त्यांनी मैं और मेरा याचा त्याग केला. स्वत:चे हित न साधणाराच व्यक्ती अनुकरणीय व अनुसरणीय असतो. संघाचा स्वयंसेवक कसा असतो, याचे उदाहरण शंकरलालजी आहेत. स्वत:ला विसरून दुसऱ्यांचा विचार करून मातृवत प्रेम करणारे ते होते. त्यांनी कधीही काेणाची उपेक्षा केली नाही. असेही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.

यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शंकरलाल खंडेलवाल यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणाऱ्या स्मृतिग्रंथाचे विमोचन करण्यात आले. शंकरलाल खंडेलवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट सेवा पुरस्कार गायत्री बालिकाश्रम, उत्कर्ष शिशूगृहाचे अध्यक्ष विजय जानी, दादा पंत यांनी स्वीकारला. यावेळी ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, निशिकांत देशपांडे यांच्या हस्ते अमोल पेडणेकर, स्मृतिग्रंथाच्या लेखिका आरती देवगावकर, पल्लवी अनवेकर, स्वप्निल बोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल खंडेलवाल यांनी केले. संचालन प्रा. विवेक बिडवई यांनी केले. आभार अतुलभाई गणात्रा यांनी मानले. वैयक्तिक गीत कविता वरघट यांनी सादर केले. कार्यक्रमाला महापौर अर्चना मसने, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, मदनलाल खंडेलवाल, रतनलाल खंडेलवाल, डॉ. तारा हातवळणे, तेजराव थोरात, विजय अग्रवाल, रामेश्वर फुंडकर, शंतनु जोशी, जयंत मसने, डॉ. नानासाहेब चौधरी, डॉ. अभय पाटील, डॉ. विनायक देशमुख, डॉ. महेंद्र ताह्मणे यांच्यासह संघपरिवारातील मान्यवर उपस्थित होते.

फोटो:

सरसंघचालकांनी काढली चूक

कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्येयमंदिर की दिशा में पग सदा बढते रहें ही गीत सादर करण्यात आले. हे गीत झाल्यावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, गीतामध्ये एक चूक काढली. त्यांनी आपका पद स्पर्श पाया देश धन्य हुआ महान...या ओळीतील चूक काढताना, देश धन्य हुआ महान नाहीतर देह धन्य हुआ महान असे सांगत त्यात दुरूस्ती केली आणि देश तर महान आहेच, असे सांगितले. त्यांनी गीतातील काढलेली छाेटीसी चूक पाहून, उपस्थित अचंबित झाले.