शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वसुली स्थगित असताना शेतकरी थकबाकीदार कसे?

By admin | Updated: November 22, 2014 00:49 IST

सहकारी संस्था निवडणूक; परस्परविरोधी शासन आदेशामुळे मतदार संभ्रमात.

वाशिम : फेब्रुवारी-मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाच्या पृष्ठभूमिवर डिसेंबर २0१४ पर्यंंत पीककर्जासाठी शेतकरी सभासदास थकबाकीदार समजू नये, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत; मात्र दुसरीकडे सहकारी संस्थांच्या निवडणुकीत थकबाकीदार सभासदांना मतदान करता येणार नाही, असा फतवा सहकार विभागाने काढल्याने मतदार संभ्रमात पडले आहेत.विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांची धामधुम सुरु झाली आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सहकारी संस् था निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. अ, ब, क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. सहकारी संस्थांच्या मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रीयाही सहकार विभागाच्यावतीने राज्यभर सुरू आहे. सहकार क्षेत्रातील ९७ व्या घटना दुरूस्तीने काही बदल केले आहेत. नव्या सहकार कायद्यानुसार, थकबाकीदार सभासदांसह जामीनदारांचाही निवडणूक लढविण्याचा अधिकार गोठविण्यात आला आहे. तद्व तच थकबाकीदारांना मतदानाचा अधिकार राहणार नाही. अशा थकबाकी असलेल्या सभासदाराने मुदतीपर्यंंंत थकबाकी भरल्यास त्याला मतदानाचा अधिकार मिळणार असल्याचे सहकार विभागाचे स्पष्ट केले आहे. वास्तविक, फेब्रुवारी, मार्च २0१४ मध्ये झालेली गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकरी सभासदांना थकबाकीदार समजू नये, असे राज्य शासनानेच आदेश दिले आहेत. २0१३-१४ या आर्थिक वर्षातील गार पीटग्रस्त आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेले शेतकरी सभासद, कर्ज रु पांतरण आणि कर्ज पुनर्गठणाचा लाभ घेणारे शेतकरी सभासद थकीत समजले जाणार नाहीत, असे शासनाचे आदेश असून, या आदेशाची अंमलबजावणी सहकारी संस्थांच्या निवडणुकीतही होणे अपेक्षीत होते; मात्र दोन परस्परविरोधी आदेशांमुळे थकीत सभासदांचा गोंधळ उडाला आहे. यावर सहकार विभाग काय भूमिका घेतो, याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. दीर्घ काळापासून कर्जाची रक्कम थकित असलेल्या सभासदांना थकीत रकमेचा भरणा करण्याची अंतिम मुदत दिली आहे. गारपीटग्रस्त व अवकाळी पावसाच्या पृष्ठभूमीवर शासनाने जाहिर केलेल्या कर्ज रुपांतरण व कर्ज पुनर्गठणाचा लाभ घेतलेल्या शे तकरी सभासदांना थकबाकीदार समजले जाणार नसल्याचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे यांनी स्पष्ट केले आहे.