शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान

By admin | Updated: May 14, 2017 20:28 IST

अखिल भारतीय छावा संघटनेचा पुढाकार : छत्रपती संभाजी महाराज जयंती

अकोला : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रविवारी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला, तसेच आत्महत्याग्रस्त अपात्र शेतकऱ्यांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड, मार्गदर्शक डॉ. दीपक मोरे, प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर पाटील, जिल्हाध्यक्ष रणजित काळे, चंदकांत झटाले, पंकज देशमुख, प्रवीण झापर्डे, जिल्हा संघटक प्रमोद देंडवे, जिल्हा उपाध्यक्ष अनंत बगाडे, जिल्हा संपर्क प्रमुख योगेश गोतमारे आदी मान्यवर विचारपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी उद्यानातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पूजन, हारार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी आत्महत्याग्रस्त अपात्र शेतकरी कुटुंबीयांना २० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात जया निंबोकार, मनोरमा इंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशीन वितरित करण्यात आली. शहीद आनंद गवई व खंडारे यांच्या कुटुंबीयांचा साडी-चोळी, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रणजित काळे यांनी केले. यामध्ये एक हजार शेतकऱ्यांना अपघाती विम्याचे कवच प्रदान करण्याचा संकल्प करण्यात आला. संचालन प्रमोद देंडवे, तर आभार योगेश गोतमारे यांनी मानले. शहरातून निघाली मोटारसायकल रॅलीअखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने रविवार, १४ मे रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ( भारत महाविद्यालय मैदान) येथून भव्य मोटारसायकल रॅलीस प्रारंभ करण्यात आला. या मोटारसायकल रॅलीला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह मान्यवरांनी भगवी पताका दाखवून सुरुवात करण्यात आली. ही रॅली दुर्गा चौक, बिर्ला रोड, स्टेशन मार्गे शिवाजी पार्क, टिळक रोड, सिटी कोतवाली, नवीन बसस्थानक, पोस्ट आॅफिस, सिव्हिल लाइन मार्गे जवाहर नगर चौक, जठारपेठ चौक या मार्गे जाऊन न्यू तापडिया नगरातील छावा बालोद्यान येथे समारोप करण्यात आला.