पालकमंत्र्यांनी केली बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:56 PM2017-11-20T22:56:43+5:302017-11-20T23:01:59+5:30

मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कपाशी पिकावर बोंडअळीचे महासंकट आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह  आ. हरिष पिंपळे यांनी लाखपुरी सर्कलमधील गावातील पिकाची पाहणी करुन  त्वरीत सर्व्हे करण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले.

Guardian Minister Conducted Inspection of Bonded Corrugated Cotton | पालकमंत्र्यांनी केली बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी

पालकमंत्र्यांनी केली बोंडअळीग्रस्त कपाशीची पाहणी

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांकडे मांडणार शेतकर्‍यांची बाजू - डॉ. रणजीत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : संपूर्ण तालुक्यातील बी.टी. कपाशीधारक शेतकर्‍यांच्या कपाशी पिकावर बोंडअळीचे महासंकट आले असून कपाशी पिक जवळपास उद्ध्वस्त झाले  आहे. या पिकावर नांगर फीरविण्यासाठी वा उभ्या पिकात गुरेढोरे चारण्याची वेळ  शेतकर्‍यांवर आलीआहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह  आ. हरिष पिंपळे यांनी लाखपुरी सर्कलमधील गावातील पिकाची पाहणी करुन  त्वरीत सर्व्हे करण्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना दिले. तसेच शेतकर्‍यांवर आलेल्या  या संकटाची तिव्रता मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री यांच्याकडे मांडणार असल्याचे  सांगितले.
संपूर्ण तालुक्यातील बी.टी. कपाशी वाण पेरणारे शेतकरी या संकटात सापडलेले  असून बोंडअळीच्या शिरकावामुळे कापूस उत्पादनात कमालीची घट होणार  असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. आधीच मुग, उडीद, सोयाबीन  पीकाचा फटका शेतकर्‍यांना बसला असून त्यांना भाव सुद्धा मिळत नाही. अशातच  महत्त्वाचे व नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशी पिक बोंडअळीच्या  तडाख्यात सापडले असून कृषी विभाग देखील यावर ठोस उपाय करण्यास असर्मथ  ठरत आहे. नुकसानाची पातळी प्रचंड असल्याने उत्पादनावर परिणाम होवून शे तकर्‍यांचा खर्च देखील निघणार नसल्याने उभ्या पिकात वरवर फीरविण्याची पाळी  शेतकर्‍यांवर आली आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी यावेळी शे तकर्‍यांनी डॉ. रणजीत पाटील यांना केली .तसेच याप्रसंगी आ. हरिष पिंपळे यांनी  देखील ना. डॉ. पाटील यांच्याकडे तालुक्यातील शेतकर्‍यांची दयनिय परिस्थिती क थन केली. शेलुबोंडे, मंगरुळ कांबे, जांभा खुर्द, उमई भटोरी, जिनापूर इ. भागातील  शेतकर्‍यांच्या पिकाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी  कुळकर्णी, तहसीलदार राहुल तायडे, तालुका कृषी अधिकारी निंघोट, कृषी  सहायक उपस्थित होते.तसेच भाजपचे कमलाकर गावंडे, बबलू ढोक, हरिभाऊ  आसरकर, राजु नाचणे, दिग्वीजय गाडेकर, तसेच शेतकरी विजय मोरे, भाष्कर  बोंडे, अरुण बोंडे, बांगर, श्रीकांत वानखडे, विजय तायडे, नंदकिशोर दशरदी, सर पंच महादेव खांडेकर, अनिल कावेर, अनिल सरोदे, उमेश बोंडे यांच्यासह बहुसं ख्य शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Guardian Minister Conducted Inspection of Bonded Corrugated Cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.