शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत लेखापरिक्षणासाठी शासन कठोर; अभिलेखे न दिल्यास ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई

By admin | Updated: November 22, 2014 00:51 IST

आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिका-यांवर.

अकोला- ग्रामपंचायतचे लेखापरिक्षण विहित मुदतीत आणि प्रभावीपणे होण्यासाठी शासनाने नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. लेखा परिक्षणासाठी अभिलेखे उपलब्ध करुन न दिल्यास संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असून, मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दक्षता घ्यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. पंचायत राज संस्थांचा पायाभूत घटक असलेल्या ग्रामपंचायतला केंद्र आणि राज्य शासनाकडून विकास कामांसाठी निधी देण्यात येतो. ग्रामनिधीचा उपयोग योग्य प्रकारे होणे आवश्यक असते. निधीमध्ये अपहार, तसेच योजना राबविताना अनियमितता झाल्याचे प्रकार यापूर्वी अनेक ठिकाणी उजेडात आले आहेत. वास् तविक ग्रामपंचायतींचा कारभार लोकाभिमुख होण्यासाठी ग्रामपंचायतचे विहित वेळेत लेखापरिक्षण होणे आवश्यक असते. लेखापरिक्षणाची जबाबदारी स्थानिक निधी लेखा परिक्षा विभागाच्या संचालकांची असते; मात्र ग्रामपंचायतचे लेखा परिक्षण विहित वेळेत होत नाही. त्यामुळे शासनाने लेखा परिक्षणाची प्रक्रिया विहि त वेळेत, प्रभावी, सुलभ होण्यासाठी ग्राम विकास विभागाने १८ नोव्हेंबर रोजी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. नजर मार्गदर्शक तत्वांवर..* लेखापरिक्षणासाठी जिल्हा परिषदेने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे.* लेखापरिक्षणासाठी अभिलेखे उपलब्ध करुन देण्यात असलेल्या अडचणींचा आढावा घेणे.* गटविकास अधिकार्‍यांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांच्या मासिक बैठकीत लेखा परिक्षणासाठी अभिलेखे उपलब्ध करुन देण्याबाबत आढावा घ्यावा. * अभिलेखे उपलब्ध करुन न दिल्यास संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध कारवाईचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे पाठविला जाईल. दोषी ग्रामसेवकावर कडक कारवाई होईल. * अभिलेखे उपलब्ध न झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी अभिलेखे पुढील महिन्यात उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी.