शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या घंटागाडीला ‘जीपीएस’प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:03 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आटोपताच ‘जीपीएस’ची निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या कचरा जमा करणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे नोंद ठेवण्यात कसूर करणाºया मोटर वाहन विभागाच्या भोंगळ कारभाराला आणि वाहन चालकांच्या मनमानीला लगाम लावण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी घंटागाड्यांना ‘जीपीएस’प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या घंटागाड्या बेपत्ता व बेवारस स्थितीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये उमटल्यानंतर आयुक्तांनी तातडीने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आटोपताच ‘जीपीएस’ची निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.अकोलेकरांच्या घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल १२५ घंटागाडीची सोय केली आहे. या वाहनाद्वारे शहरातील हॉस्पिटल, हॉटेल, खानावळी, दुकाने, बाजारपेठेतून कचरा जमा करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी मनपाने वाहन चालकांच्या नियुक्त्या केल्या.सकाळी ७ वाजतापासून ते दुपारी २ वाजतापर्यंत या वाहनाद्वारे ओला व सुका कचरा जमा करून त्याची नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. दुपारी २ वाजतानंतर ही वाहने मोटर वाहन विभागात जमा करणे अपेक्षित आहे. तसे होत नसल्याची परिस्थिती आहे. २०१६ मध्ये या वाहनांवर नियुक्त झालेल्या चालकांच्या मनमानी कारभारात वाढ झाली असून, चक्क रात्री ११ वाजतापर्यंत शहरातील हॉटेल, खानावळींमधील अन्न जमा करून त्याची विल्हेवाट लावताना अनेक वाहने फिरताना आढळून येतात. अर्थात, महापालिकेच्या इंधनाचा गैरवापर करीत वाहन चालक स्वत:च्या तुंबड्या भरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही वाहने मोटर वाहन विभागात जमा न करता थेट वाहन चालकांच्या घरी उभी केली जातात. हा प्रकार कमी म्हणून की काय, उघड्यावर बेवारस स्थितीत सोडून वाहन चालक पळ काढत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी कचरा जमा करणाºया वाहनांना ‘जीपीएस’प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला आहे.मोटर वाहन विभागावर नाराजी

  • मोटर वाहन विभागाच्या कामकाजावर आयुक्त संजय कापडणीस यांची तीव्र नाराजी असल्याची माहिती आहे.
  • शहरातील कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्या, उघड्यावरील कचरा उचलण्यासाठी मनपाच्या मालकीचे व खासगी तत्त्वावर लावण्यात आलेले ट्रॅक्टर असा मोठा लवाजमा असताना शहरात कचºयाची समस्या दिसून येते.

कचरा जमा केल्यानंतर संबंधित वाहन मोटर वाहन विभागात जमा करणे भाग आहे. मनपाच्या इंधनाचा व वाहनांचा खासगी कामांसाठी होणारा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही. त्यासाठीच ‘जीपीएस’प्रणाली कार्यान्वित केली जाईल.-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका