शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजना रखडली

By admin | Updated: January 2, 2015 00:34 IST

हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित.

बुलडाणा : अनुदानीत, विना अनुदानीत, प्राथमिक, माध्यमिक शाळातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने दिली जाणारी 'सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती' गेल्या तीन वर्षापासून विद्यार्थ्यांंना मिळाली नाही. पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक हजारावर विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित असून प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी ह्यसुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीह्ण ही योजना २0१0-११ पासून लागू केली आहे. प्रत्येक वर्षी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांंना तीन टप्प्यात ही शिष्यवृत्ती दिली जाते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय संबंधित मुख्याध्यापकांच्या नावे या शिष्यवृत्तीचा धनादेश पाठविते; हा धनादेश वटवून लाभार्थी विद्यार्थ्यांंना त्याचे वाटप करण्याची जबाबदारी संबंधीत शाळांची आहे. मात्र, शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी अनेकवेळा परस्पर तो आपल्या खात्यात जमा करून या शिष्यवृत्तीची रक्कम परस्पर खर्च करतात. यामुळे लाभार्थी गरीब विद्यार्थी वंचित राहतात. विद्यार्थ्यांंचे आता राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे, त्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी असे आदेश असताना शाळा व्यवस्थापन त्याकडे साफ दुर्लक्ष करुन ती देण्यास विलंब करत आहे. बुलडाणा जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांंची संख्या ३00 असून त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यात विद्यार्थ्यांंची संख्या २00 आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ५00 विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचिंत आहेत.