शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी - 'वंचित'चे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 17:20 IST

Akola News, Agitation शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचेवतीने आंदोलन करण्यात आले.

अकोला : अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर, मूग उडीद ही महत्त्वाची पिके उद‍्ध्वस्त झाली. सलग ८० दिवस शेतात पाणी साचून राहिल्याने झाडांना कीड लागून तेही कुजले. कापसाचे झाड एक फुटापेक्षा अधिक वाढले नाही. पुरामुळे अनेक ठिकाणी शेतातला सुपीक मातीचा थर वाहून गेल्याने नवीनच संकट उभे राहिले आहे. जुने कर्ज कायम असताना नव्या कर्जामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची गरज असून, सरकारी पातळीवर सगळीकडे अनास्थाच दिसून येतेय. याचा निषेध करतानाच शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचेवतीनेआंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर झालेल्या या आंदाेलनात सरकाराच्या नाकर्तेपणाबद्दल राेष व्यक्त करण्यात आला. या आंदाेलनानंतर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवदेनात नमूद केले आहे की, दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांचे यंदा अतिवृष्टीने कंबरडे मोडल्याने तेथे पुन्हा आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजारो हेक्टरवरची पिके वाहून गेली आहेत. डोक्यावर बँकांचे व सावकारांचे कर्ज, त्यात हे अस्मानी संकट यामुळे आधीच देशोधडीला लागलेला शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुसरीकडे सरकारी यंत्रणा निद्रिस्त असल्याचा आराेप केला आहे.

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली नाही, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी विदर्भात येऊन शेतकऱ्यांची दुःखं समजावून घेतली नाही. प्रत्यक्ष मदत मात्र अद्यापही जाहीर केली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा व तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या आंदाेलनात पक्षाचे प्रदेश पदाधिकारी राजेंद्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जि. प. अध्यक्ष प्रतिभा भोजने, अरुंधती शिरसाठ, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, प्रभा शिरसाट, राजकुमार दामोदर आदी सहभागी झाले हाेते.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीagitationआंदोलन