शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जन सोमवारीच!

By admin | Updated: September 4, 2014 01:24 IST

अकोला येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणूक सोमवारीच काढण्यात येणार

अकोला : भाविकांचं लाडकं दैवत गणरायाचे आगमन होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला आहे. निम्मे दिवस झाल्यानंतर आता भाविकांना वेध लागले आहेत ते गणेश विर्सजनाचे. यंदा गणेश विसर्जन अनंत चतुदश्रीला ८ सप्टेंबरला आहे; परंतु या दिवशी पौर्णिमा येत असल्यामुळे गणेश विर्सजन करावे की करू नये, याबाब त भाविकांमध्ये संभ्रम होता; मात्र प्रशासनासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणूक सोमवारीच काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.गणेश विसर्जन दरवर्षी अनंत चतुदर्शलीचा केले जाते. यावर्षी अनंत चतुदश्रीच्या दिवशी ८ सप्टेंबरला सकाळी १0 वाजून ४८ मिनिटांनी प्रोष्ठपदी पौर्णिमा लागत असल्याने विसर्जन नेमके केव्हा करावे, सकाळी की दु पारनंतर याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ८ सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेला प्रारंभ होऊन ९ स प्टेंबरला सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होईल. त्यामुळे अनंत चतुर्दशी ७ सप्टेंबरला सकाळी १0 वाजून ४८ मिनिटांपर्यंतच असल्याने विसर्जनाबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजेच ९ सप्टेंबरला पितृपक्षास प्रारंभ होत असल्याने श्राद्धकाळात गणेश विसर्जन होऊ शकत नाही, असादेखील एक तर्क आहे. त्यामुळेच विसर्जनाला घेऊन भाविक संभ्रमित झाले होते. अकोला येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ८ सप्टेंबरलाच गणेश विसर्जनाचा निर्णय घेतला आहे. जोतिषाचार्यदेखील ८ सप्टेंबरच्या बाजूनेच असून, त्यांनी पौर्णिमेची विसर्जनाला बाधा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अकोला शहरातील गणेश विसर्जन ८ सप्टेंबरलाच होईल, हे निश्‍चित झाले आहे.*अकोला शहरात गणेश विसर्जनासाठी आम्ही ८ सप्टेंबर ही तारीख निश्‍चित केली आहे. सर्व पदाधिकार्‍यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात बैठक घेऊन विसर्जनाच्या तयारीची रूपरेषा आखल्या जाणार आहेत. भाविकांनी कुठलाही संभ्रम न ठेवता गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे. - गुलाबराव गावंडे,अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अकोला*अनंत चतुर्दशी सोमवार, ८ सप्टेंबरलाच आहे. जरी या दिवशी दिवसभर पौर्णिमा असली तरी गणेश विसर्जनाला कुठलीही बाधा नाही. विसर्जनासाठी हा दिवस योग्य आहे. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत केव्हाही गणेश विसर्जन करण्याला हरकत नाही. शक्यतो सूर्यास्ताच्या आताच विसर्जन करावे. - मोहनशास्त्री जलतारे,जोतिषाचार्य