शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीस चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी अकोट येथील न्यायालयाचा निर्णय.

आकोट ( जि. अकोला) : तेल्हारा येथील एका महाविद्यालयात प्रवेश मिळाला की नाही, हे पाहण्याकरिता जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली वाडी अदमपूर येथील आरोपी शरद विठ्ठल बाजोड यास आकोट येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २८ मे रोजी सक्तमजुरीची शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील अँड. जयकृष्ण गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै १४ रोजी तेल्हारा येथील डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात प्रवेश मिळाला किंवा नाही, याकरिता दोन मैत्रिणी जात असताना आरोपी शरद विठ्ठल बाजोड याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या घटनेच्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक खाटमोडे पाटील तेल्हारा येथे निरीक्षणाकरिता येत असताना ही घटना घडली. सदर आरोपीने आपला विनयभंग केल्याची तक्रार सदर मुलीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक खाटमोडे यांच्याकडे घटनास्थळीच केली. खाटमोडे यांचे आदेशावरून तपासाची चक्रे त्वरित फिरून तेल्हारा पो. स्टे. येथे आरोपी शरद बाजोडविरुद्ध भादंवि कलम ३५४ (१) व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २0१२ चे कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती पो. स्टे. निरीक्षक अन्वर एम. शेख यांनी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीविरुद्ध आकोट येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सु. वा. चव्हाण यांच्या न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खाटमोडे यांच्यासह ६ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा असल्यामुळे न्यायालयाने आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २0१२ चे कलम ८ अंतर्गत चार वर्ष सक्तमजुरी व १0 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंडापैकी ५ हजार रुपये पीडित मुलीच्या वडिलांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश पारित केला. सरकार पक्षातर्फे जयकृष्ण गावंडे यांनी बाजू मांडून युक्तिवाद केला तर पैरवी अधिकारी म्हणून हेकाँ. पालेकर यांनी सहकार्य केले.