शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

मूर्तिजापुरातील चौघांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 6:33 PM

शहरातील तीन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना ५ जून रोजी उपजिल्हा रुग्णालातून सुटी देण्यात आली आहे.

मूर्तिजापूर : शहरातील तीन जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना ५ जून रोजी उपजिल्हा रुग्णालातून सुटी देण्यात आली आहे. यापूर्वी हिरपूर येथील महिलेनेही कोरोनावर मात केल्याने तिला सुटी देण्यात आली होती.मूर्तिजापूर शहरातील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांपैकी ६२ जणांना क्वारंटीन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पुनर्तपासणीत जवळच्या ३ नातेवाइकांचे अहवाल २७ मे रोजी पॉझिटिव्ह आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले असून, त्यांना शुक्रवारी तर हिरपूर येथील महिलेला चार दिवसांपूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.यापूर्वी ६२ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते, तर हिरपूर येथील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, २५ मे रोजी २० लोकांचे स्वॅब घेऊन पाठविण्यात आले होते. त्यातील १२ लोकांचे स्वॅब पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. १२ पैकी ३ महिलांचा अहवाल २७ मे रोजी पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांना उपचारासाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. २५ मे रोजी मृतकाच्या संपर्कातील १२ लोकांचे स्वॅब नमुने परत घेण्यात आले होते. त्यात इतर ८ लोकांच्या नमुन्यांचा समावेश होता. २७ मे रोजी संध्याकाळपर्यंत १४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, परत घेतलेल्या १२ नमुन्यातील तीन अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सदर पॉझिटिव्ह रुग्ण हे तीनही महिला असून, मृतक इसमाच्या जवळचे नातेवाईक आहेत. तेव्हापासून त्यांना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ ठेवण्यात आले होते. ५ मे रोजी ते तिन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला व कोकणवाडी भागातील एक रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे यांनी ‘लोकमत’ला दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसीलदार प्रदीप पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र नेमाडे, निवासी नायब तहसीलदार आर. बी. डाबेराव, ठाणेदार शैलेश शेळके, डॉ. अभिजित मुरळ यांच्यासह रुग्णालयाचा स्टाफ उपस्थित होता. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMurtijapurमुर्तिजापूर