शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आणखी पाच शेतक-‍यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 3, 2015 02:36 IST

पश्‍चिम वर्‍हाडातील दोन शेतक-‍यांसह एका शेतमजुराने संपवली जीवनयात्रा.

अकोला : दोन शेतकर्‍यांसह एका शेतमजुराने आत्महत्याच्या केल्याच्या घटना पश्‍चिम वर्‍हाडात गुरूवारी घडल्या. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे जिवनयात्रा संपविणार्‍या या शेतकर्‍यांमध्ये एक वाशिम जिल्ह्यातील, तर दोघे बुलडाणा जिल्ह्यातील आहेतवर्धेतील दोन आणि नगरमधील एकाचा समावेश आहे.. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ खुर्द येथील अंबादास पांडुरंग निर्मळ (वय ४५) हे २९ मार्च रोजी शेगाव येथे जात असल्याचे सांगून घरून निघून गेले होते. ३0 मार्च रोजी त्यांनी शेगाव परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. निर्मळ यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांच्याकडे पतसंस्थेचे कर्ज थकीत होते. नापिकी आणि कर्जामुळे ते आर्थिक विंवचनेत होते. दुसर्‍या एका घटनेत, वाशिम जिल्ह्यातील येवता बंदी येथील एका ५५ वर्षिय शेतकर्‍याने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततचे आजारपण आणि नापिकीला कंटाळून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. अरुण लक्ष्मण बोनके हे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथील शेतमजूर गणपत संपत लाहुडकर (वय ५५) यांनी गुरूवारी आत्महत्या केली. ते शेती ठोक्याने घेवून करीत होते. यावर्षी शेतीत लावलेला खर्चसुध्दा निघणे कठीण झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शेतमजुराने हिंगणा शिवारातील एका शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.