शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनाच हायटेक प्रचाराची ओढ

By admin | Updated: August 20, 2014 00:21 IST

राजकारणाचा सायबर सेल: विधानसभा प्रचारात फेसबुक, व्हॉट्स अँपचा वापर वाढणार

अकोला: २१ व्या शतकातील माहिती तंत्नज्ञानाचा आविष्कार म्हणजे मोबाईल फोन. अन्न, वस्त्न, निवारा आणि संवाद ही ई-युगाची गरज बनली आहे. मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून विकसित झालेल्या सोशल मीडियामुळे जग अतिशय जवळ आले आहे. संवाद, प्रचार आणि प्रसाराची मोठी जत्नाच या मीडियामध्ये रोज भरते आहे. विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्ष, उमेदवार, त्यांचे सर्मथक, कार्यकर्त्यांसह सर्वांनाच हायटेक प्रचाराची ओढ लागली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने स्वत:चा सायबर सेल स्थापन करून या ई-मीडियाचा जोरदार वापर सुरू केला आहे. फेसबुक, ऑक्यरुट, व्हॉट्स अँप या सोशल मीडियावरून उमेदवारांनी हायटेक प्रचाराची रणधुमाळी निवडणूक कार्यक्रमाआधीच सुरू केली आहे. फेसबुक, व्हॉट्स अँपसह सोशल मीडिया सध्या आघाडीवर आहे. फेसबुक, व्हॉट्स अँपवरून तर दर मिनिटाला अपडेट होणारी राजकीय मंडळी वेगवेगळी छायाचित्ने व डिझाईन अपलोड करीत आहेत. कोणता राजकीय नेता कुठल्या सभेत काय बोलला, हे लगेच समजू लागले आहे. ही हायटेक यंत्रणा राबविण्यासाठी काही राजकीय नेते, पदाधिकार्‍यांनी स्वत:च्या कार्यालयात तंत्रज्ञांची नियुक्तीही केली आहे. हे तंत्रज्ञ या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनाही या हायटेक प्रचार कसा करायचा, याबाबतचे प्रशिक्षण देत आहेत.