शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कर्मचा-यांनी सोमवार गाजविला

By admin | Updated: December 23, 2014 00:42 IST

महापौरांच्या दालनात महिला कर्मचा-यांचा गोंधळ; तर शिक्षकांचा मनपा आयुक्तांच्या निवासस्थानासमोर ठिय्या.

अकोला: आठ महिन्यांचे वेतन देण्यास टाळाटाळ करणार्‍या महापालिका प्रशासनाच्या विरोधात शिक्षकांनी आंदोलन छेडले असून, आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निवासस्थानासमोर सोमवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने किमान सहा महिन्यांचे वेतन अदा न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचे संकेत शिक्षक संघटनांनी दिले आहेत. त्याच प्रमाणे थकीत वेतनाच्या मुद्यावर संतप्त झालेल्या आस्थापनेवरील महिला सफाई कर्मचार्‍यांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या दालनात सोमवारी दुपारी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी महापौर तसेच उपमहापौर मनपात उपस्थित नव्हते. संतप्त महिला कर्मचार्‍यांची समजूत घालताना सुरक्षा रक्षकांची प्रचंड तारांबळ उडाली. अखेर विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी महिला कर्मचार्‍यांच्या समस्या ऐकून घेत, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर महिलांनी घरचा रस्ता पकडला.