शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

पारधी समाज विकासासाठी शिक्षण व प्रशिक्षण वर्ग

By admin | Updated: April 3, 2015 02:28 IST

सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी १७.२५ कोटी रुपयांची तरतूद.

खामगाव (बुलडाणा): आधुनिक युगातही वाडी, वस्त्या व तांड्यांमध्ये उघड्यावरच राहणार्‍या पारधी समाजाच्या विकासासाठी विकास कार्यक्रमांतर्गत १७.२५ कोटी रुपये खर्चास शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ३१ मार्च रोजी एका आदेशान्वये मंजुरी दिली. स्वातंत्र्याची साठी उलटली असतानाही अनुसूचित जमातीमध्ये मोडणारा पारधी समाज विकासापासून कोसो दूर आहे. शैक्षणिक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या हा समाज मागासलेलाच आहे. या समाजातील अनेकांकडे राहण्यासाठी घर नाही. उदरनिर्वाहाचे साधन म्हणून कोणताही व्यवसाय नाही. त्यामुळे पारधी विकास कार्यक्रमांतर्गत समाजाच्या सर्वांंगिण विकासासाठी, सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या आवडीनुसार त्यांना व्यवसाय प्रशिक्षण व त्यानुसार व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आदिवासी उपयोजनेंतर्गत सन २0१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये पारधी विकास कार्यक्रमाकरिता २३ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. या निधीच्या ७५ टक्के प्रमाणात १७.२५ कोटी इतका निधी खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहेत. शैक्षणिक प्रवाहापासून दूर असलेल्या पारधी समाजबांधवांना शिक्षण प्रवाहात आणणे, युवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, तसेच व्यवसायासाठी अर्थसहाय्य या निधीतून देण्यात येणार आहे. *या आहेत उपाययोजना या योजनेंतर्गत पारधी समाज बांधवांसाठी १२00 घरकूल बांधकामाचे लक्षांक असून प्रत्येकी १ लाख रूपये याप्रमाणे १२00 लाखाची तरतूद केली आहे. तसेच दारिद्रय रेषेखालील भूमिहीन पारधी आदिवासी समाजास स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत जिरायत तसेच बागायती जमीन उपलब्ध करुन देणेसाठी ६0 लक्षांक असून प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे ३00 लाख, रोजगाराचे कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रत्येकी २0 हजार याप्रमाणे ६५ जणांसाठी एकूण १३ लाख, व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य ४0 जणांना प्रत्येकी ५0 हजार याप्रमाणे २0 लाख, शालाबाह्य विद्यार्थ्यांंना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांना शिक्षण तथा प्रशिक्षण देणे यासाठी २000 गावात वर्ग उघडण्यात येणार आहे. या वर्गावर प्रतिगाव अपेक्षित खर्च १000 रुपये याप्रमाणे २0 लाख, तसेच सुशिक्षित पारधी युवक, युवतींना प्रशिक्षित करण्यासाठी १000 गावात वर्ग सुरु करणे यासाठी १५0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.