शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत व्यावसायिकांचे ‘दिवाळे’

By admin | Updated: October 26, 2014 00:41 IST

अकोला शहरात दिवाळीनिमित्त झाली ३४ कोटी रुपयांची उलाढाल,मात्र मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्के घट.

अकोला : दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण. या सणानिमित्त नवनवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. याही दिवाळीत कोट्यवधींची खरेदी अपेक्षित असताना पीक परिस्थितीचा फटका या सणाला बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा २५ टक्के कमी उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दिवाळीत चांगला व्यवसाय होईल म्हणून विविध व्यावसायिकांनी आपल्या प्रतिष्ठानांमध्ये भरगच्च माल भरला; परंतु अपेक्षित व्यवसाय न झाल्याने या दिवाळीत व्यावसायिकांचे दिवाळे निघाल्याचे दिसून आले. मात्र गतवर्षीच्या तुलनेने यंदा कार खरेदी २0 टक्के वाढल्याचे व्यावसायिकांनी नमूद केले आहे. मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील हातचे पीक गेल्याने शेतकरी पुरता खसला. गारपिटींमुळे शेतकर्‍यांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्या गेले. गहू, हरभरा, भुईमूग, कपाशी, फळबागा पिके उद्ध्वस्त झाले. कर्ज काढले, संपूर्ण कुटुंब शेतात राबले, पीक उभे झाले; मात्र गारपिटीने तोंडचा घास पळविला, आता संसाराचा गाडा कसा ओढू, या विवंचनेत शेतकरी सापडला. अकोला, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी, बाळापूर, तेल्हारा तालुक्यातील गहू, हरभरा, लिंबू पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यंदा अल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिकंही समाधानकारक नाहीत. पिक परिस्थितीचा फटका सर्वच क्षेत्रातील उलाढालीवर झाला आहे. दसरा-दिवाळीसारख्या महत्त्वपूर्ण सणाच्या दिवसात उद्योग क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात उलाढाल झाल्यामुळे ऐन दिवाळीत व्यावसायिकांचे दिवाळे निघाल्याचे चित्र आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दागिने तसेच मोटार, कार, ट्रॅक्टर्स, दुचाकी, तीनचाकी वाहन व फ्रीज, मोबाईल फोन, एलईडी, वॉशिंग मशीन सोफासेट आदी वस्तू व्यावसायिकांनी दुकानांमध्ये भरून ठेवल्या होत्या. मात्र सोयाबीन व अन्य रोख उत्पन्न देणार्‍या पिकांनी दगा दिल्यामुळे बळीराजा खरेदीसाठी बाजारात फिरकलाच नाही. नोकरदारांमुळे निदान ४0 ते ४५ टक्के व्यवसाय झाल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले. मात्र आवश्यक असणार्‍या वस्तूंच खरेदी करण्याकडे सामान्य वर्गाचा कल होता.