जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित

By Admin | Updated: June 14, 2017 02:13 IST2017-06-14T02:13:59+5:302017-06-14T02:13:59+5:30

शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Disrupted power supply at the water purification center | जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित

जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा मंगळवारी पुन्हा खंडित झाला. त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला असून, शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.
महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठ्यात सातत्याने बिघाड होत असल्याचे चित्र आहे. गत आठवड्यात तब्बल चार दिवस बार्शीटाकळी तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रावरील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ न जलशुद्धीकरण केंद्रावरील पाण्याचा उपसा बंद पडला होता. मंगळवारी रात्री ८ वाजता जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा पुन्हा बंद झाला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने समोर ढकलण्यात आला आहे.

Web Title: Disrupted power supply at the water purification center