शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विकास गेला खड्ड्यात; आधी मोकाट डुकरे, जनावरांचा बंदोबस्त करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 15:51 IST

प्रभागांमध्ये उच्छाद मांडणाऱ्या मोकाट डुकरांच्या समस्येला अकोलेकर प्रचंड वैतागले आहेत.

अकोला: शहरातील दर्जाहीन व निकृष्ट सिमेंट रस्त्यांचे तुणतुणे वाजवणे बंद करा, विकास गेला खड्ड्यात. आधी मोकाट डुकरे व जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचा संतप्त सूर अकोलेकरांमधून उमटत आहे. प्रभागांमध्ये उच्छाद मांडणाऱ्या मोकाट डुकरांच्या समस्येला अकोलेकर प्रचंड वैतागले आहेत. एक हजार कोटींच्या विकास कामांचा गवगवा करणाºया सत्ताधारी भाजपसह लोकप्रतिनिधींचा सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाºया समस्यांकडे कानाडोळा का, असा सवाल अकोलेकर उपस्थित करू लागले आहेत.शहरात स्वच्छ भारत अभियान कागदावर राबवणाºया महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपचे मूलभूत सुविधांकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याची परिस्थिती आहे. मनपाने शहर हगणदरीमुक्तीसाठी थातूर-मातूर प्रयत्न केले असले तरी डुकरांची समस्या कायम असल्याचे दिसून येत आहे. डुकरांच्या विष्ठेतून परिसरात दुर्गंधी व घातक जिवाणू पसरत असल्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी अकोलेकरांकडून सातत्याने होत आहे. सर्वपक्षीय नगरसेवकच नव्हे तर खुद्द महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांच्या प्रभागात मोकाट डुकरांनी अक्षरश: उच्छाद मांडला असून, नागरिक वैतागले आहेत. सत्ताधारी भाजपच्यावतीने शहरात १ हजार कोटींच्या विकास कामांचा गवगवा केला जात असला तरी प्रत्यक्षात मूलभूत सुविधांची पुरती दाणादाण उडाल्याची परिस्थिती आहे. मोकाट डुकरांमुळे विविध आजार पसरत असून, नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानंतरही प्रशासनासह सत्ताधारी भाजपचे व विद्यमान लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का, अकोलेकरांच्या समस्या निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधी व सत्तापक्षातील पदाधिकारी मनपा प्रशासनाला निर्देश देतील का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.जीवापेक्षा मते महत्त्वाची!जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये वराह पालनाचा व्यवसाय करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. याव्यतिरिक्त कृषी उत्पन्न बाजार समितीलगतच्या विजय नगर, अकोट फैल रस्त्यालगतच्या बापू नगर परिसरात वराह पालक केल्या जाते. यातील बहुतांश व्यावसायिक महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. संबंधित कर्मचाºयांच्या व्यवसायाची मनपा प्रशासनासह नगरसेवकांना संपूर्ण माहिती आहे. मोकाट डुकरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असला तरी केवळ मतांच्या लाचारीपायी नगरसेवकांनी चुप्पी साधणे पसंत केल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका