शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

तोतया अँन्टी करप्शन अधिकारी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 02:07 IST

अकोला : एका तोतया अँन्टीकरप्शनच्या अधिकार्‍याने बेहिशेबी मालमत्तेविषयी चौकशी करायचे सांगत, डॉक्टरला धमकावल्यानंतर डॉक्टरने तोतया अधिकार्‍यास चर्चेत गुंतविल्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या तोतया अधिकार्‍यास गुरुवारी रंगेहात अटक केली. सदर तोतया अधिकार्‍यास शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अच्चुतराव नंदू सावंत असे या तोतया अधिकार्‍याचे नाव आहे.

ठळक मुद्देपोलिसांची कारवाईडॉक्टरला गंडविण्याचा  प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एका तोतया अँन्टीकरप्शनच्या अधिकार्‍याने बेहिशेबी मालमत्तेविषयी चौकशी करायचे सांगत, डॉक्टरला धमकावल्यानंतर डॉक्टरने तोतया अधिकार्‍यास चर्चेत गुंतविल्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या तोतया अधिकार्‍यास गुरुवारी रंगेहात अटक केली. सदर तोतया अधिकार्‍यास शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अच्चुतराव नंदू सावंत असे या तोतया अधिकार्‍याचे नाव आहे.डॉ. मधुसुदन बगडिया यांचे सिव्हिल लाइन्स येथील अमानखॉ प्लॉटमध्ये निवासस्थान व हॉस्पिटल आहे. बुधवारी डॉ. बगडिया हे रुग्ण तपासत असताना त्यांच्या रुग्णालयात अँन्टी करप्शनचा अधिकारी असल्याची बतावणी करून, अच्चुतराव नंदू सावंत त्यांच्याकडे आला. त्याने त्याचा परिचय दिला. तुमच्या बाभूळगाव येथील शेतात दोन कोटी रुपये आहेत. तुमच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आहे. त्याची चौकशी करायची असल्याचे या तोतया अधिकार्‍याने डॉ. बगडिया यांना सांगितले. डॉक्टर बगडिया यांना या तोतया अधिकार्‍यावर संशय आल्याने, डॉक्टरांनी घाबरल्याचे नाटक करीत त्याला बसवून ठेवले. त्यानंतर अँन्टी चेंबरमध्ये जाऊन सिव्हिल लाइन्स पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाची माहिती ठाणेदार अन्वर शेख यांना मिळताच, ते ताफ्यासह तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी या तोतया अधिकार्‍याची चौकशी केली असता, त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. यामुळे त्याचा खरा चेहरा पोलिसांसमोर आला. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

साक्षी सहगलही ताब्यातआरोपी अच्चुतराव नंदू सावंत याच्यासोबत एक महिला आहे. हे दोघे सोबत असतात. त्यामुळे पोलिसांनी काही अंतरावर दबा धरून बसलेल्या  साक्षी देवेंद्र सहगल नामक महिलेला ताब्यात घेतले. तिची विचारपूस सुरू असून, तिचा सहभाग काय? याविषयी पोलीस चौकशी करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार अन्वर एम. शेख, पोलीस निरीक्षक संतोष अघाव यांनी केली. चुकीच्या ठिकाणामुळे बिंग फुटले!

डॉक्टरांकडे आलेला तोतया अधिकारी अच्चुतराव नंदू सावंत याने बाभूळगाव येथील शेतीचा उल्लेख केला. मात्र, डॉ. बगडिया यांची शेती  बाभूळगाव शिवारात नसल्याने त्यांना संशय आला. आपण आयकर विभाग व अँन्टी करप्शन अशा दोन्ही विभागातून आलो, असे सांगितले व त्याच्या ओळखपत्रावर त्याचे नाव दिसून न आल्याने डॉ. बगडिया यांना संशय आला. याच कारणामुळे या तोतयाचे बिंग फुटले.