शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्त सरसावल्या; आरोग्य अधिका-याला अल्टिमेटम

By admin | Updated: June 20, 2015 02:46 IST

स्वच्छतेच्या कामात हलगर्जी चालणार नसल्याचा इशारा.

अकोला: ऐन पावसाळ्य़ात शहराच्या कानाकोपर्‍यात घाण व कचर्‍याचे ढीग साचल्यामुळे विविध जीवघेण्या साथरोगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या विविध भागात तुंबलेली गटारे- घाण, कुजलेल्या कचर्‍याची गंभीर स्थिती ह्यलोकमतह्णने उजेडात आणताच प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली. प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी शुक्रवारी सकाळी विविध भागातील साफसफाईच्या कामाची पाहणी करीत क्षेत्रीय अधिकारी व साहाय्यक आरोग्य अधिकार्‍याला अल्टिमेटम दिला. पावसाळ्य़ाच्या दिवसात शहरातील मोठे नाले, गटारे घाणीने तुडुंब साचली आहेत. आरोग्य विभाग प्रमुख व स्वच्छता निरीक्षकांच्या पाठबळामुळे आस्थापनेवरील सफाई कर्मचार्‍यांसह खासगी सफाई कर्मचार्‍यांनी स्वच्छतेच्या कामाला ठेंगा दाखवल्याने मुख्य रस्ते, बाजारपेठ, खासगी रुग्णालये, हॉटेल परिसरासह सर्व्हिस लाइनमध्ये घाणीचे ढीग आहेत. यामध्ये खुद्द भाजप-शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसह नगरसेवकांच्या प्रभागांचा समावेश आहे. यासंदर्भात लोकमतने विशेष वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली. माधुरी मडावी यांनी शुक्रवारी स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली असता, घाण व कचर्‍याचे ढीग आढळून आले.