शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला ८ जागी फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:45 IST

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात अवघ्या एका जागेवर समाधान तर मानावे लागले आहेच;

- रवी टालेअकोला: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात अवघ्या एका जागेवर समाधान तर मानावे लागले आहेच; परंतु निकालांवर फार मोठा परिणाम करण्यातही आघाडी अपयशी ठरली आहे. सायंकाळी सहा वाजतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या केवळ आठ उमेदवारांना फटका बसला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजय जरी मिळवू शकले नाहीत, तरी त्यांनी घेतलेल्या मतांमुळे संपुआ उमेदवारांना मोठ्या प्रमाणात धक्का बसेल, हा कयास धुळीस मिळाला आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी ४३ मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी, पाच जागांवर संपुआ, एका जागेवर वंचित बहुजन आघाडीे, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर होता. नऊ मतदारसंघ वगळता उर्वरित सर्व मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळालेली मते नगण्य आहेत. राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी केवळ नऊ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहा आकडी मते मिळवू शकले. या कामगिरीमुळे विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविण्याच्या अ‍ॅड. आंबेडकरांच्या घोषणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.>‘वंचित’ची कामगिरीवंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरअकोला व सोलापूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभूत झाले आहेत. ते अकोल्यात दुसऱ्या, तर सोलापुरात तिसºया क्रमांकावर राहिले.बुलडाणा, गडचिरोली-चिमूर, हातकणंगले, नांदेड, परभणी, सांगली, सोलापूर आणि यवतमाळ-वाशिम या आठच मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने विजयी मताधिक्यापेक्षा जास्त मते घेतली.वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना पराभव चाखावा लागला. त्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनाही हार पत्करावी लागली.( संपादक)

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019akola-pcअकोला