शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

गत हंगामातील नुकसानाचे कृषी बाजारपेठेवर सावट

By admin | Updated: June 15, 2015 02:08 IST

ना पुनर्गठन ना कर्ज, शेतक-यांकडे पैसेच नाहीत.

विवेक चांदूरकर / अकोला: गतवर्षी दोन्ही हंगाम हातून गेले. पेरणी तर दूरच कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठीही पैसे नाहीत. अशातच बँका कर्ज पुनर्गठन करण्यात आडकाठी आणीत असल्यामुळे शेतकर्‍यांपुढे पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या पीक नुकसानाचे सरळ पडसाद यावर्षी कृषी बाजारपेठेवर पडत आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांना खरीप हंगामासाठी ३४४६७ लाख रुपयांचे लक्ष्य देण्यात आले. यापैकी केवळ १२ टक्के ४४१९ लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा बँकेला ८७५७८ लाख रुपयांचे लक्ष्य असून, त्यांनी ४७३२६ लाख म्हणजे ३३ टक्के कर्जाचे वाटप केले आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा झाला असून, जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. शेतकर्‍यांनी पेरणीसाठी मशागत करून जमीन सज्ज केली आहे. आता केवळ मॉन्सूनची वाट आहे. १७ ते १८ जून रोजी मॉन्सून दाखल होणार असून, शेतकरी पेरणी करणार आहेत. मात्र, शेतकर्‍यांकडे पेरणी करण्यासाठी, पिकांना खत देण्यासाठी पैसेच नाहीत. दुसरीकडे बँका कर्ज पुनर्गठनास टाळाटाळ करीत आहेत. शेतकरी बँकांमध्ये कर्ज घेण्यासाठी ये-जा करीत आहेत. मात्र, बँका त्यांना पुनर्गठन करण्यास नकार देत आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ १२ टक्केच कर्जवाटप केले आहे. त्यामुळे बँकांना कर्जवाटप करायचेच नाही, असे निदर्शनास येत आहे. बँकेच्या कर्जवाटपाच्या आडमुठेपणाचा सरळ परिणाम बाजारपेठेवर पडत आहे. शेतकर्‍यांनी बियाणे व खत खरेदी करण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे बाजारपेठेत शांतता आहे.