शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक ...पाच दिवसांत ७०५ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 10:00 IST

CoronaVirus in Akola तब्बल ७०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ३५० नव्या रुग्णांची भर पडली.

ठळक मुद्दे रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. ७०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

अकोला : गत सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या थैमानाने दहशतीत असलेल्या अकोलेकरांसाठी सप्टेंबर महिन्याची अखेर व आॅक्टोबर महिन्याची सुरुवात दिलासा देणारी ठरली आहे. २८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत कोरोनाची लागण होणाऱ्यांच्या तुलनेत या संसर्गजन्य आजारावर मात करणाºयांचा आकडा दिलासा देणारा आहे. या कालावधीत तब्बल ७०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ३५० नव्या रुग्णांची भर पडली.एप्रिल महिन्यात पहिला रुग्ण सापडलेल्या अकोला शहर व जिल्ह्यात नंतरच्या महिन्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. सप्टेंबर महिन्यात तर रुग्णसंख्या दिवसागणिक तिहेरी आकड्याने वाढली. आज रोजी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या साडेसात हजारांपेक्षा अधिक झाली आहे. तर १,१०० पेक्षा अधिक रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. सप्टेंबर महिन्यात घातांकी स्वरूपात रुग्णवाढ झाल्यानंतर या महिन्याचे अखेरचे तीन दिवस व आॅक्टोबर महिन्यातील पहिल्या दोन दिवसांत रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. या कालावधीत झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये ३५० जण पॉझिटिव्ह आढळून आले. या तुलनेत या पाच दिवसांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, विविध कोविड केअर सेंटर्स, खासगी हॉटेल व रुग्णालये आणि होम क्वारंटीन असलेल्या तब्बल ७०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.१,११७ अहवाल निगेटिव्हशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबमध्ये गत पाच दिवसांत एकूण १,४६७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी तब्बल १,११७ जणांचे नमुने निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. तर ३५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चाचण्यांचे प्रमाण कमी झालेले नसतानाही रुग्णवाढीचा वेग कमी होणे, ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला