शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

CoronaVirus in Akola : दोन दिवसांत ११ बळी; ३०८ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:39 AM

गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत जिल्ह्यातील ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत जिल्ह्यातील ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २९४ व रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्यंमध्ये १४ असे ३०८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६,२७५ झाली आहे. तर मृतकांचा आकडा २०३ वर गेला आहे. आतापर्यंत ४,६७२ जणांनी कोरोनावर मात केल्याने सध्या १,४०० अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५१९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९८ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४२१ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर येथील १५ जणांसह अंबुजा सिमेंट फॅक्टरी कान्हेरी गवळी येथील नऊ, आदर्श कॉलनी येथील सात, रणपिसे नगर येथील पाच, जुने शहर, खडकी, जीएमसी, मलकापूर येथील प्रत्येकी तीन, जठारपेठ, विठ्ठल नगर, रिधोरा, गोकूल नगर, आळंदा, हिरपूर ता. मूर्तिजापूर, जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, बोरगाव मंजू, पाथर्डी ता. तेल्हारा, मच्छी मार्केट, पोळा चौक, जैन मार्केट कान्हेरी गवळी, मेहरे नगर, दहिगाव गावंडे, तेल्हारा, डाबकी रोड, कुरूम, सांगवामेळ ता. मूर्तिजापूर, अनभोरा, जवळा ता. मूर्तिजापूर, कुरणखेड, कपिलवस्तू नगर, कोठारी वाटिका, बाळापूर नाका, चिंचोली रुद्रायणी, जठारपेठ, म्हातोडी, बार्शीटाकळी, शास्त्रीनगर, शिवाजी विद्यालय, खोलेश्वर, रविनगर, महसूल कॉलनी, पाटणकर कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या सात रुग्णांमध्ये डाबकी रोड, पत्रकार कॉलनी, गोरक्षण रोड, हिंगणी ता. अकोट, जठारपेठ, रणपिसे नगर व अंबिका नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

दोन महिला, नऊ पुरुषांचा मृत्यूशुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये रणपिसे नगर येथील ७७ वर्षीय पुरुष, संताजी नगर डाबकी रोड येथील ६८ वर्षीय पुरुष, माळीपुरा येथील ६५ वर्षीय पुरुष, कानशिवणी येथील ५३ वर्षीय पुरुष, अक्कलकोट, जुने शहर येथील ३५ वर्षीय पुरुष, कृषी नगर येथील ६० वर्षीय महिला व बाळापूर येथील ६८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.मंगळवारी चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये रणपिसे नगर येथील ५१ वर्षीय व ७५ वर्षीय पुरुष, पातोंडा येथील ५५ वर्षीय महिला व शिवणी येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.रॅपिड चाचण्यांमध्ये १० पॉझिटिव्हगुरुवार व शुक्रवारी दिवसभरात झालेल्या रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्यांमध्ये १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत १५,५०९ चाचण्यांमध्ये १,०२९ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.७९ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३६, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १६, आयकॉन हॉस्पिटल येथील चार, होटल रिजेन्सी येथून चार, कोविड केअर सेंटर, अकोट येथून १०, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून तीन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून सहा अशा एकूण ७९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१,४०० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६,२७५ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४,६७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २०३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,४०० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला