शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सर्व प्रकारचा कचरा साफ करा!

By admin | Updated: September 12, 2016 02:27 IST

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा मेळाव्यात खा. धोत्रे यांचे आवाहन.

अकोला, दि. ११: चारित्र्य गेले की सारे संपले. सिद्धांत आणि चारित्र्यावर पक्ष उभा राहिला आहे, याची जाण ठेवा. थोडे काम करा पण चांगले करा. भौतिक विकासासोबत तळागाळातील माणसांचीदेखील प्रगती होईल, असे कौशल्य शिका. बदमाश अधिक श्रीमंत होत आहे आणि शंभर एकर शेती असून, शेतकरी गरीब राहत आहे. चांगल्या माणसाच्या हाती कारभार आला पाहिजे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा धागा पकडून खा. संजय धोत्रे यांनी सर्व प्रकारचा कचरा साफ करण्याचे आवाहन केले. रविवारी स्थानिक खंडेलवाल भवनात झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. दिग्विजय दिन म्हणून हा मेळावा पार पडला. अकोला जिल्हय़ातील सर्व तालुक्यांचे पदाधिकारी येथे बहुसंख्येने उपस्थित होते.मंचावर खा. संजय धोत्रेसह महापौर उज्‍जवलाताई देशमुख, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, आकाश फुंडकर यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी अँड. गिरीश गोखले, प्रताप अरसड, संजय शर्मा, अक्षय लहाने, संजय मिरगे, अनुप गोसावी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांची येथे समयोचित भाषणे झाली. आगामी महापालिका, जि. प. निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सफाया करण्याचा संकल्प पदाधिकार्‍यांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. आमदार शर्मा यांनी भाजयुमोचे कौतुक करीत २0 वर्षे मोदींची सत्ता कायम राहील फक्त आईसोबत बेइमानी करू नका, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सागळे आणि अंबरीश कविश्‍वर यांनी केले, तर आभार अनुप गोसावी यांनी मानले.