सर्व प्रकारचा कचरा साफ करा!

By Admin | Updated: September 12, 2016 02:27 IST2016-09-12T02:27:48+5:302016-09-12T02:27:48+5:30

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा मेळाव्यात खा. धोत्रे यांचे आवाहन.

Clear all garbage! | सर्व प्रकारचा कचरा साफ करा!

सर्व प्रकारचा कचरा साफ करा!

अकोला, दि. ११: चारित्र्य गेले की सारे संपले. सिद्धांत आणि चारित्र्यावर पक्ष उभा राहिला आहे, याची जाण ठेवा. थोडे काम करा पण चांगले करा. भौतिक विकासासोबत तळागाळातील माणसांचीदेखील प्रगती होईल, असे कौशल्य शिका. बदमाश अधिक श्रीमंत होत आहे आणि शंभर एकर शेती असून, शेतकरी गरीब राहत आहे. चांगल्या माणसाच्या हाती कारभार आला पाहिजे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा धागा पकडून खा. संजय धोत्रे यांनी सर्व प्रकारचा कचरा साफ करण्याचे आवाहन केले. रविवारी स्थानिक खंडेलवाल भवनात झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. दिग्विजय दिन म्हणून हा मेळावा पार पडला. अकोला जिल्हय़ातील सर्व तालुक्यांचे पदाधिकारी येथे बहुसंख्येने उपस्थित होते.
मंचावर खा. संजय धोत्रेसह महापौर उज्‍जवलाताई देशमुख, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, आकाश फुंडकर यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी अँड. गिरीश गोखले, प्रताप अरसड, संजय शर्मा, अक्षय लहाने, संजय मिरगे, अनुप गोसावी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांची येथे समयोचित भाषणे झाली. आगामी महापालिका, जि. प. निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सफाया करण्याचा संकल्प पदाधिकार्‍यांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. आमदार शर्मा यांनी भाजयुमोचे कौतुक करीत २0 वर्षे मोदींची सत्ता कायम राहील फक्त आईसोबत बेइमानी करू नका, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सागळे आणि अंबरीश कविश्‍वर यांनी केले, तर आभार अनुप गोसावी यांनी मानले.

Web Title: Clear all garbage!