शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

साफसफाईला ठेंगा; नगरसेवकांची देयकांसाठी ‘लॉबिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 13:14 IST

साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन गंभीर असले तरीही नगरसेवकांच्या आशीर्वादामुळे पडीक प्रभागातील कंत्राटदारांनी साफसफाईला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे.

अकोला : पडीक प्रभागात दैनंदिन स्वच्छता राखण्याचा गवगवा करणाºया कंत्राटदारांच्या कामचुकारपणाचे पितळ उघडे पाडत मध्यंतरी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी देयकांमध्ये मोठी कपात केली होती. आता पुन्हा एकदा प्रशासनाची पकड सैल होताच कंत्राटदारांच्या माध्यमातून दुकानदारी करणाºया काही नगरसेवकांनी देयकाची रक्कम प्राप्त करण्यासाठी जीवाचा आटापिटा चालविल्याची माहिती आहे. साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन गंभीर असले तरीही नगरसेवकांच्या आशीर्वादामुळे पडीक प्रभागातील कंत्राटदारांनी साफसफाईला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे.महापालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांसाठी प्रशासकीय प्रभाग तर खासगी सफाई कर्मचाºयांसाठी पडीक प्रभाग अशी रचना करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात स्वच्छतेची कामे करण्यास मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. यात तथ्य असले तरी पडीक प्रभागातही साफसफाईचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येते. काही ठरावीक प्रभागातील नाल्या, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी सत्ताधारी भाजप व प्रशासनाने ५१ पडीक भागांची निर्मिती केली. त्यासाठी खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली. एका पडीक प्रभागासाठी ४८ सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले. प्रशासकीय असो वा पडीक प्रभागात नाल्या, सर्व्हिस लाइन, रस्ते, सार्वजनिक ठिकाणांसह खुल्या मैदानांची नियमित साफसफाई होणे अपेक्षित असताना आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांसह खासगी कर्मचाºयांनी साफसफाईला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे. ही बाब महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांच्या वेतनातून दंडाची रक्कम कपात करण्यासोबतच पडीक प्रभागातील कंत्राटदारांच्या देयकात कपात करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाºयांना दिले आहेत. मध्यंतरी आयुक्त कापडणीस यांनी स्वत: साफसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर कंत्राटदारांच्या देयकातून मोठी रक्कम कपात केली होती. प्रशासनाची पकड सैल होताच स्वच्छतेच्या नावाखाली कंत्राटदारांच्या आडून मलिदा ओरपणाºया नगरसेवकांनी देयकासाठी महापालिकेत ‘लॉबिंग’ सुरू केली आहे.खर्च कोट्यवधींचा तरीही...शहरातील दैनंदिन साफसफाईच्या कामाच्या बदल्यात मनपाकडून महिन्याकाठी कोट्यवधींचा खर्च केला जातो. यामध्ये आस्थापनेवरील तसेच पडीक प्रभागातील स्वच्छता कर्मचाºयांचे वेतन, भाडेतत्त्वावरील ट्रॅक्टर, मनपाचे ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. तरीही शहरात घाण व कचरा साचल्याचे चित्र दिसून येते. अशा स्थितीत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ साठी गुण कसे प्राप्त होतील, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

पडीक प्रभाग बनले कमाईचे साधन!सत्ताधारी भाजपाने साफसफाईच्या नावाखाली तयार केलेले पडीक ५१ भाग सर्वपक्षीय नगरसेवकांच्या कमाईचे साधन बनले आहेत. बहुतांश प्रभागातील कंत्राट नगरसेवकांच्या नातेवाइकांनी मिळवले आहेत. एका नगरसेवकाच्या दिमतीला १२ खासगी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यावर महिन्याकाठी ९७ हजार रुपये खर्च होतो. काही प्रभाग पूर्णत: पडीक असल्याने त्या ठिकाणी ४८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या देयकावर महिन्याकाठी ३ लाख ८८ हजार रुपये खर्च केले जात असले तरी प्रभागात साफसफाईची ऐशीतैशी झाल्याचे दिसून येते. स्वत:चे खिसे भरण्याच्या मानसिकतेतून तीन किंवा चार मजुरांच्या मदतीने थातूरमातूर साफसफाईची कामे केली जात आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका