शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे प्रभारी लेखापाल गोत्यात

By admin | Updated: May 16, 2015 00:38 IST

वाढीव बजेट केले मंजूर; आयुक्तांकडून ‘शो कॉज’.

अकोला: महापौर उज्ज्वला देशमुख यांनी अर्थसंकल्पाच्या मंजूर ठरावाची प्रत प्रशासनाकडे सुपूर्द न केल्यावरही मनपाचे प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांनी रस्ते अनुदानाच्या निधीतून वाढीव खर्चाचे बजेट मंजूर केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी आयुक्त सोमनाथ शेटे लेखापाल पाचपोर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.महापालिकेच्या अर्थ व वित्त विभागात प्रचंड अनागोंदी निर्माण झाली आहे. बांधकाम विभागासह जलप्रदाय व स्वच्छता विभागातील थकीत कोट्यवधी रुपयांची देयके अदा करण्याचे काम आयुक्तांनी सुरू केले. यामध्ये सन २00५ पासूनच्या जुन्या कामांच्या देयकांचा समावेश असून, बहुतांश कामे कागदोपत्री करण्यात आली. बांधकाम विभागाला वेळोवेळी प्राप्त रस्ते अनुदान निधीतून केवळ देयके लाटण्यासाठी अधिकार्‍यांचे हात शिवशिवत आहेत. याकरिता बांधकाम, वित्त व लेखा विभागातील अधिकार्‍यांचा कमालीचा समन्वय आहे. यामधूनच रस्ता अनुदानापोटी प्राप्त १ कोटी २८ लाख रुपयांतून बांधकाम विभागाने ४३ लाख रुपये विकास कामांसाठी राखीव ठेवत उर्वरित निधीतून देयके अदा करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित ८४ लाखांतून मर्जीतल्या कंत्राटदारांची देयके काढण्यासाठी महापौर, उपमहापौरांनी आयुक्तांकडे यादी सादर केली. ही बाब विरोधी पक्षातील नगरसेवकांना माहिती होताच त्यांनीही आयुक्तांकडे तगादा लावला. ८४ लाखांच्या रकमेचे बजेट मंजूर करण्यासाठी प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांना धाकदपट करण्यात आली. या गडबडीत पाचपोर यांनी १ कोटी ९ लाखांचे बजेट मंजूर केले. यामध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍याने सुचविलेल्या १२ लाख रुपये देयकांचा समावेश होता. परंतु महापौरांनी सन २0१५-१६ च्या मंजूर अंदाजपत्रकाच्या ठरावाची प्रत प्रशासनाकडे सादर न केल्याने प्रभारी लेखापाल पाचपोर यांनी मंजूर केलेले बजेट वादाच्या भोवर्‍यात सापडले. ही बाब लक्षात येताच, आयुक्त सोमनाथ शेटे यांनी पाचपोर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारी सुरू केली आहे.