शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्राच्या नमुन्यात होणार बदल

By admin | Updated: November 22, 2014 00:54 IST

शासनाचे आदेश, प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू.

सिध्दार्थ आराख/ बुलडाणाअनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांंना लागणारी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांमध्ये बदल करण्यात आला असून, त्यामुळे आता शासनाच्या नव्या प्रपत्रानुसार जात प्रमाणपत्र विद्यार्थ्यांंंना मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यात नव्या प्रमाणपत्र वाटपाचे काम प्रायोगिक तत्वावर सुरूही करण्यात आले आहे.अनुसूचित जाती, जमातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना शैक्षणिक कामासाठी जातीचे प्रमाणपत्र काढावे लागते. या जात प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांंंना विविध शिष्यवृत्त्या मिळत असतात. यासोबतच भूमिहीन शेतमजुरांच्या पाल्यांसाठी ह्यआम आदमी विमाह्ण योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठीही जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे. या प्रमाणपत्रामध्ये शासनाने बदल केला असून, नव्या स्वरूपात जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समितीने नव्या जात प्रमाणपत्राची मागणी केल्यास मोठा गोंधळ होऊन विद्यार्थ्यांंंना मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंंडही सहन करावा लागणार आहे. अमरावती जिल्ह्यात असाच प्रकार घडला आहे. ते थील विद्यार्थ्यांंंना नव्याने जात वैधता प्रमाणपत्र काढण्याची अट लागू केल्यामुळे, विद्यार्थ्यांंंना शैक्षणिक कामं सोडून जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव तयार करावे लागत आहेत. विशेष म्हणजे ज्यांनी जुन्या जात प्रमाणपत्रावर नोकरी मिळविली, त्यांनासुध्दा नवे जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यासंदर्भात समाजकल्याण विभागाकडे सध्यातरी कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी, अमरावती जिल्ह्यात नव्या प्रमाणपत्राची अट लागू झाली असून टप्प्यात सर्वत्र लागू होणार असल्याने विद्यार्थी वर्गात संभ्रम आहे.