शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ७१.0४ टक्के मतदान

By admin | Updated: June 21, 2014 00:32 IST

शिक्षक मतदार संघ निवडणूक : १७ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

बुलडाणा : विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघासाठी आज २0 जून रोजी मतदान घेण्यात आले. यावेळी तालुक्यातील ८२२ शिक्षक व प्राध्यापकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून त्याची टक्केवारी ७५.८३ एवढी आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात ७१.0४ टक्के शिक्षकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज २0 जून रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील तेराही तहसिल कार्यालयात मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठरविण्यात आली होती. सकाळी १0 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांचा शुकशुकाट दिसून आला. परंतु त्यानंतर शिक्षकांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. उपरोक्त पाचही जिल्ह्यात जवळपास ४४ हजार मतदार होते. तर एकट्या बुलडाणा तालुक्यात १ हजार १४ शिक्षक मतदार होते. त्यापैकी ८२२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून त्यामध्ये ७0३ पुरूष व ११९ महिला शिक्षकांचा समावेश आहे. त्याची टक्केवारी ७५.८३ टक्के आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात ७१.0४ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदाना दरम्यान कुठलीही अनुचित घटना होवू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
मेहकर तालुक्यात ८९३ शिक्षक मतदारांपैकी ६२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ५७५ पुरुष व ४६ महिला शिक्षक मतदारांनी मतदान केले असून, मेहकर तालुक्यात ६९.५४ टक्के मतदान झाले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात ४५९ शिक्षक मतदारांपैकी ३२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३१२ पुरुष व १७ महिला शिक्षक मतदारांनी मतदान केले असून, सिंदखेडराजा तालुक्यात ७१.६७ टक्के मतदान झाले आहे. संग्रामपूरात तालुक्यात ६८.४६ टक्के मतदान झाले. २६0 मतदारांपैकी १७८ जणांनी मतदान केले. यामध्ये पुरुष शिक्षक १६३ व महिला १५ यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी फोटो आयडीसाठी थोडीफार अडचण झाली होती.
खामगाव येथील केंद्रावर ५१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तालुक्यात ५९.१५ टक्के मतदान झाले. शेगाव येथील तहसिल कार्यालयात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ६८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जळगाव जामोद तालुक्यातील ३६0 पैकी २७७ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मोताळा तालुक्यात ७४.८६ टक्के मतदान झाले तर
लोणार तालुक्यात ७२.६३ टक्के मतदान झाले आहे.