शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेत ‘जलयुक्त शिवार’च्या ४७९ कामांना ब्रेक! जिल्ह्यात १,१९५ कामांना प्रशासकीय मान्यता

By संतोष येलकर | Updated: April 3, 2024 16:42 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी १ हजार १९५ कामांना दोन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्ण करण्यात आली

अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी १ हजार १९५ कामांना दोन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्ण करण्यात आली असून, १८१ कामे सुरू असली तरी, लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेत प्रशासकीय मान्यता आणि ‘वर्क आॅर्डर ’ बाकी असलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या ४७९ कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.

जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत २०२३-२४ या वर्षासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील १३१ गावांची निवड करण्यात आली असून, संबंधित गावांच्या शिवारात जलयुक्त शिवारची कामे करण्यासाठी १३१ कोटी ७० लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जलयुक्त शिवारची विविध १ हजार ६७४ कामे मंजूर करण्यात आली. त्यापैकी १ हजार १९५ कामांना दोन महिन्यांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असली तरी त्यापैकी ९० कामे पूर्ण करण्यात आली असून, १८१ कामे सुरू आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर ) बाकी असलेली जिल्ह्यातील ‘जलयुक्त शिवार’ची ४७९ कामे थांबल्याचे चित्र आहे.

४७९ कामांना प्रशासकीय मान्यता; वर्क ऑर्डर बाकी!जलयुक्त शिवार अभियानमध्ये जिल्ह्यात मंजूर १ हजार ६७४ कामांपैकी ४७९ कामांना प्रशासकीय मान्यता आणि कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या कालावधीत या कामांच्या प्रशासकीय मान्यतासह ‘वर्क ऑर्डर’ देता येणार नसल्याने, आचारसंहितेत या कामांना ‘ब्रेक’ लागल्याचे चित्र आहे.

मान्यता असूनही ९२४ कामे रेंगाळली!लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात १ हजार १९५ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० कामे पूर्ण करण्यात आली असून, १८१ कामे सुरू असली तरी, मान्यता असूनही उर्वरित ९२४ कामे रेंगाळल्याचे चित्र आहे.

अशी आहेत कामे!जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील १३१ गावांत १ हजार ६७४ जलयुक्त शिवारची विविध कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामध्ये ढाळीचे बांध, शेततळे, नाला खोलीकरण व रुंदीकरण, सिमेंट नाला बंधारे, द्वारयुक्त बंधारे, बांधावरील वृक्षलागवड व कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार