शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीने आक्रमण केल्याने १४ एकरातील पऱ्हाटी कापली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 10:57 IST

कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने उत्पादनच मिळत नसल्याचे चित्र आहे.

- विठ्ठल बोळे लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरगाव (अकोला): परतीच्या पावसाने आधीच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च लावलेल्या कपाशीतून केवळ ३५३ किलोच उत्पादन झाल्याने डोंगरगाव येथील तीन शेतकऱ्यांनी १४ एकरातील पºहाटी कापून टाकली आहे.डोंगरगाव येथील शेतकरी रमेश नारायण देवकर आणि गणेश देवकर यांनी नऊ एकर शेतामध्ये कपाशी पिकाची लागवड केली होती. पीक चांगले होते; मात्र ऐन बोंड्या लागण्याच्या काळात संततधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसाने बोंड्या काळ्या पडल्या तर फुले आणि पाती गळून पडली. तरीही कपाशी पिकाला लागलेला खर्च निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. या आशेवर त्यांनी वेचणी केली असता नऊ एकर शेतामध्ये केवळ १ क्विंटल ५० किलो कापूस आला. पहिल्या वेचणीनंतर २० ते २५ दिवसांनीही कपाशी फुटली नाही. त्यामुळे त्यांनी शेतामध्ये पाहणी केली असता बोंडअळीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्याचे आढळले. त्यांना ९ एकरात केवळ आतापर्यंत १५० किलो कापसाचे उत्पादन झाले. यामध्ये वेचणीसाठी ९ मजूर लागले. त्यांची मजुरी १ हजार ८०० रुपये झाले. कापसाचा दर्जा चांगला नसल्याने केवळ ३५०० रुपयांचा मिळाला. त्यामुळे आतापर्यंत लागलेला खर्चही निघाला नसल्याने हताश झालेल्या शेतकºयांनी ९ एकरातील पºहाटी कापून टाकली.हीच परिस्थितील संतोष रूपसिंग राठोड यांच्यावर आली. त्यांनी बाळासाहेब देशमुख यांची पाच एकर शेती पाच एकर पन्नास हजार रुपये देऊन केली. त्यामध्ये त्यांनी कपाशीची लागवड केली. पेरणीपासून तर आतापर्यंत कपाशीची मशागत, फवारणीसाठी हजारो रुपयांचा खर्च केला. कापसाची पहिली वेचणी केली असता, त्यांना केवळ २१३ किलो कापूस झाला. त्यानंतर कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळी आल्याने उत्पादनच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांनी हताश होऊन आपल्या पाच एकरातील पºहाटी कापून टाकली. ५० हजार रुपये देऊन त्यांनी शेती केली होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी