शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बीटीचे पाकीट तीनशे रुपयात !

By admin | Updated: June 25, 2014 02:40 IST

विदर्भातील शेतकर्‍यांची फसवणूक

अकोला : तणनाशक तंत्रज्ञान असल्याचे भासवून विदर्भात सर्रासपणे बोगस बीटी कापसाचे बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जात आहे. पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे शेतकर्‍यांचा कल कापूस पिकाकडे वाढला आहे. याचाच गैरफायदा बोगस बीटी बियाणे विक्री करणारे घेत आहेत. एका नामांकि त बीटी कापूस कंपनीने बोंडअळीला प्रतिबंधक जिन्ससोबतच बीटी बियाण्यांमध्ये तनणाशकाचे तंत्रज्ञान टाकले असून, लवकरच हे तंत्रज्ञान बाजारात येणार आहे. हे बियाणे बाजारात येण्याअगोदरच विक्रेत्यांनी तीनशे रू पयात बोगस बीटी विकण्याचा सपाटा लावला आहे.
गत वर्षी विदर्भातील कापसाचे क्षेत्र सोयाबीनने घेतले होते; मात्र कापसाचे एकरी १0 ते १२ क्विंटलचे उत्पादन झाल्याने, या खरीप हंगामात कापसाचा पेरा वाढणार आहे. चांगल्या व भरघोस उत्पादनासाठी शेतकर्‍यांनी बीटी कापसाचे बियाणे खरेदी करणे सुरू केले आहे. परंतु आरआर, राऊंडअप बीटी, तणावरची बीटी, वीडगार्ड बीटी असे अनेक बोगस व बेकायदेशीर बीटी कापसाचे बियाणे बाजारात विकले जात आहे. या बियाण्यामध्ये बोंडअळीला प्रतिबंध जिन्स असून, ते तणनाशक असल्याचे शेतकर्‍यांना पटवून दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी या बीटीला बळी पडत आहे. हे बियाणे अधिकृत नसून, ते विकण्याची शासनाने परवानगी दिलेली नाही. या बियाण्यांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नाही. असे असताना या बिटीची विदर्भात सर्रास विक्री सुरू आहे. कृषी विभागाने काही विक्रेत्यांवर थातूर मातूर कारवाई केली; मात्र बियाण्याची विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याने कारवाईदेखील मोठय़ा प्रमाणात करण्याची गरज आहे. अमरवती येथील कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी याप्रकरणी काही विक्रेत्यांवर कारवाई केली असल्याचे सांगीतले. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल न चुकता घेण्याचे अवाहन केले.