शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील अपहृत बालकाचा अकोटमध्ये खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 03:30 IST

खुनानंतर पेट्रोल टाकून जाळले : पठार नाल्यात घडला प्रकार

अकोट, दि. १७- : अमरावती येथील बालकाचे अपहरण करून अकोट शहरानजीकच्या पठार नाल्यात खून झाल्याची खळबळजनक घटना १७ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. या घटनेतील आरोपी हा मृत मुलाचा सावत्र बाप आहे. त्यानेच मुलाचे अपहरण करून त्याचा खून करून जाळल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. अमरावती येथील रमण मंगेश दांडगे ( वय ८ वर्षे) याचे ९ फेब्रुवारी रोजी अपहरण झाले होते. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन येथे अपहृत मुलाची आई प्रज्ञा दांडगे यांनी मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध ३६३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत रमणचा सावत्र बाप याच्यावर पोलिसांचा संशय होता व त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. दरम्यान, १६ फेब्रुवारीला अकोट शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी बम्मनवाला प्लॉट येथून आरोपी मंगेश नागोराव दांडगे रा.प्रथोट, जि.अमरावती याला जेरबंद करून फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या ठिकाणी त्याची कसून तपासणी केली असता, त्याने आपल्या सावत्र मुलाचे अपहरण करत खून केल्याची कबुली दिली. मंगेश दांडगे याने रमणला अकोट शहरानजिकच्या पठार नाल्यात नेऊन त्याचा खून केला, तसेच त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळले, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळ गाठले असता, रमणचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे. घटनास्थळी फ्रेजरपुरा येथील पोलीस पथक व अकोट शहर पोलिसांनी पाहणी केली. याप्रकरणी अधिक तपास फ्रेजरपुरा अमरावती पोलीस करीत आहेत. सावत्र बापाचे कृत्य अमरावती येथून अपहरण झालेला रमण दांडगे हा आरोपी मंगेश दांडगे याचा सावत्र मुलगा होता. मंगेश दांडगे याचा पहिला विवाह झाला होता; मात्र त्याची पहिली पत्नी लग्नानंतर काही महिन्यातच सोडून गेली होती. अशातच त्याच्या नातेवाइकांमार्फत मंगेशने प्रज्ञा यांच्याशी दुसरा विवाह केला. प्रज्ञा यांना पहिल्या पतीपासून रमण हा मुलगा होता, तर मंगेश व प्रज्ञा यांना तीन वर्षांची मुलगी आहे. अलीकडे मात्र पती-पत्नीमध्ये वादविवाद विकोपाला गेले होते. त्यामुळे प्रज्ञा माहेरी अमरावती येथे रहावयास गेली होती. आरोपीने तेथूनच सावत्र मुलाचे अपहरण करून अमानवीय कृत्य केले.