शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

काळीपिवळीची धडक; एक ठार महिलेसह काळीपिवळीचा चालक जखमी

By admin | Updated: June 3, 2014 01:52 IST

अकोला: काळीपिवळी टॅक्सीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला. त्याच्या पत्नीसह काळीपिवळी चालक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोअरेजजवळ घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

अकोला: काळीपिवळी टॅक्सीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला. त्याच्या पत्नीसह काळीपिवळी चालक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोअरेजजवळ घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
सस्ती येथील राहणारे सिद्धार्थ शिवहरी अंभोरे हे त्यांची पत्नी संगीता अंभोरे हिला घेऊन एमएच ३0 डब्ल्यू ९५८८ क्रमांकाच्या मोटारसायकलने मालेगावहून लग्न समारंभ आटोपून अकोल्याकडे येत होते. दरम्यान समोरून भरधाव येणार्‍या एमएच ३0 बी २५९६ क्रमांकाच्या काळीपिवळी टॅक्सीने त्यांच्या मोटारसायकलला पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोअरेजजवळ जोरदार धडक दिली. यात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले. सिद्धार्थ अंभोरे व त्यांच्या पत्नीला सवार्ेपचार रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी सिद्धार्थ अंभोरे यांना मृत घोषित केले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेली त्यांची पत्नी व काळीपिवळी टॅक्सीचा चालक यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सिद्धार्थ अंभोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष (ग्रामीण) होते. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी सवार्ेपचार रुग्णालयात मोठी गर्दी केली.
*** ट्रॅक्टरची मोटारसायकलला धडक, एकजण ठार, एक गंभीर
ट्रॅक्टरने मोटारसायकला दिलेल्या धडकेमध्ये युवक ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास आपातापा रोडवर घडला.
मारोडी येथील अश्विन गणेश खोडके (२0) आणि त्याचा सहकारी ज्ञानेश्वर प्रल्हाद चव्हाण (२७) हे दोघे सायंकाळी आपातापा येथे गेले होते. त्यांचे काम झाल्यानंतर दोघेही मोटारसायकलने घरी जाण्यासाठी परतत होते. आपातापा रोडवर समोरून येणार्‍या ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात अश्विन व ज्ञानेश्वर दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सवार्ेपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अश्विनची तपासणी केल्यानंतर तो मरण पावल्याचे सांगितले. त्याचा सहकारी ज्ञानेश्वर चव्हाण याचीसुद्धा प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.