शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्च न करणारे बीडीओ गोत्यात!

By admin | Updated: February 19, 2017 02:32 IST

सीईओंनी दिल्या जबाबदार धरण्याच्या नोटिस

सदानंद सिरसाटअकोला, दि. १८- १३ आणि १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याकडे सातही पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी कमालीचे दुर्लक्ष केल्याचा प्रकार घडत आहे. त्यासाठी सप्टेंबरपासून आतापर्यंत सहा पत्र दिल्यानंतरही गटविकास अधिकार्‍यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. विकास कामांचा निधी खर्च होत नसल्याने कारवाई प्रस्तावित करण्याची नोटिस मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी दिली आहे. तेराव्या वित्त आयोगातून २0१४-१५ मध्ये प्राप्त निधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर अनुक्रमे ७0, २0 आणि दहा टक्के या प्रमाणात वाटप करण्यात आला. तो निधी खर्च न झाल्याने त्यासाठी ३१ डिसेंबर २0१६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर १४ व्या वित्त आयोगातून २0१५-१६ मध्ये गावांमध्ये प्राधान्याने करावयाच्या कामासांठी निधी देण्यात आला. तो निधी खर्च करण्याची मुदत ३0 जून २0१६ पर्यंंत वाढवण्यात आली होती. ती मुदतही ३१ डिसेंबर २0१६ पर्यंत दिली. मात्र, त्यातून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण स्तरावर कोणतीही कामे झाली नाही. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांनी सप्टेंबर २0१६ पासून फेब्रुवारीपर्यंंत गटविकास अधिकार्‍यांना सातत्याने सहा पत्रे देत हा निधी खर्च करण्याचे बजावले. तरीही निधी खर्चाचा टक्काच वाढत नाही. या प्रकाराला गटविकास अधिकारी जबाबदार आहेत. पंचायत समिती प्रमुख असताना शासन धोरणांची अंमलबजावणी न करणे, आर्थिक खर्चाचे अहवाल सादर न करणे, कामाचा आढावा न घेणे, ग्रामपंचायत स्तरावर प्रचंड निधी पडून असणे, त्या कामावर नियंत्रण नसणे, यासाठी सातही गटविकास अधिकार्‍यांना कारणे दाखवा बजावण्यात आली आहे. निधी खर्च केवळ १५ टक्के शासनाने २0१५-१६ साठी दिलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हय़ात केवळ १५ टक्के खर्च झाल्याची माहिती आहे. ८५ टक्के रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर तशीच पडून आहे. त्यातून वित्त आयोगाच्या विकास आराखड्यातील कामांची प्रगती दिसून येते.