प्रभाग १९मध्ये बालेकिल्ल्याची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 02:31 IST2017-02-18T02:31:43+5:302017-02-18T02:31:43+5:30

कौलखेडचा बालेकिल्ला आता कुणाचा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Battle of the Citadel in Division 19 | प्रभाग १९मध्ये बालेकिल्ल्याची लढाई

प्रभाग १९मध्ये बालेकिल्ल्याची लढाई

अकोला, दि. १७-कौलखेड हा कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता; मात्र बालेकिल्ल्याचे प्रमुख राष्ट्रवादीत आणि अनेक शिलेदार भाजपात गेले. त्यामुळे कौलखेडचा कधी काळचा हा बालेकिल्ला आता कुणाचा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका प्रभाग १९ मध्ये कौलखेड, जेतवननगर, धोबी खदान, पावसाळे ले-आउट, नवीन खेताननगर, संतोषनगर, हिंगणा रोड, बलोदे ले-आउट आदी परिसर येतो.
ह्यअह्ण प्रवर्गात भारिप-बमंसकडून श्रीकांत अहिर, राष्ट्रवादीकडून अजय इंगोले, भाजपकडून धनंजय धबाले, शिवसेनेकडून राहुल मस्के, काँग्रेसकडून देवीदास सोनोने, कवाडे यांच्या पीपल रिपब्लिकन पार्टीकडून सुरेश हिवाळे असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यबह्ण प्रवर्गात शिवसेनेकडून संगीता डाबेराव, काँग्रेसकडून सुनीता मसराम, राष्ट्रवादीकडून अर्चना अनिल माहोरे, भाजपकडून मंगला सोनोने आणि एक अपक्ष असे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यकह्ण प्रवर्गात राष्ट्रवादीकडून पंकज गावंडे, शिवसेनेकडून चंद्रहास ताथोड, भारिप-बमसंकडून सुभाष नागे, भाजपकडून संजय बडोणे, काँग्रेसकडून अशोक लाड आणि आनंद बलोदे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यडह्ण प्रवर्गात काँग्रेसकडून नाझीयाबी अब्दुल लतीफ, शिवसेनेकडून उषा पांडे, राष्ट्रवादीकडून पुष्पा पावसाळे, भाजपकडून योगिता पावसाळे, भारिपकडून सुषमा राठोड, दोन अपक्ष असे एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या वजनदार उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. या लढतीमध्ये कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Battle of the Citadel in Division 19