शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

शेती नावावर करण्यासाठी तलाठय़ाने घेतली लाच

By admin | Updated: January 7, 2015 01:31 IST

अकोला येथील घटना, शेतीची पत्नीच्या नावावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून तलाठय़ानी घेतली १५00 रुपयांची लाच.

अकोला : वारस लागलेल्या शेतीची पत्नीच्या नावावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून १५00 रुपयांची लाच घेणार्‍या आपातापा, नावखेडच्या तलाठय़ास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वसंत टॉकिजजवळ रंगेहाथ अटक केली. दापुरा मजलापूर येथील एका शेतकर्‍याने तलाठय़ाच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानुसार, त्यांच्या कुटुंबातील अडीच एकर शेती वडिलांच्या नावावर आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर शेतीला वारस लागले. तक्रारदाराने आई व बहिणींचे ना-हरकत प्रमाणपत्र लिहून घेतले आणि नमुना ९ सह शेती त्यांच्या पत्नीच्या नावे करण्यासाठी तलाठी हिंमतराव रामभाऊ मानकर (५१) यांच्याकडे अर्ज केला. हिंमतराव मानकर यांनी या कामासाठी शेतकर्‍याला ३५00 रुपयांची मागणी केली. त्यानुसार शेतकर्‍याने दोन हजार रुपये दिले. त्यानंतरही मानकर यांनी शेतीचे कागदपत्र देण्यास टाळाटाळ केली आणि पुन्हा लाचेची मागणी केली. त्यामुळे शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तलाठी मानकर याने शेतकर्‍यास पैसे घेऊन मंगळवारी दुपारी वसंत टॉकिजजवळील एका पानपट्टीवर बोलावले. ठरल्यानुसार शेतकरी १५00 रुपये घेऊन टॉकिजजवळ आला. या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला होता. तलाठी मानकर याने लाचेची रक्कम घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याला रंगेहाथ अटक केली आणि लाचेची रोकड जप्त केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक सचिन्द्र शिंदे, निरीक्षक यू. ए. जाधव, मंगेश मोहोड, एएसआय सुधाकर गाडगे, सुरेश महल्ले, संतोष उंबरकर, सुनील राऊत, सुनील पवार, संतोष दहिहांडे यांनी केली.