शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

संधीच्या शक्यतेमुळे  बळीराम सिरस्कार यांचा राष्ट्रवादीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:33 IST

काँग्रेसचा पर्याय वगळून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता बळावली आहे.

अकोला : भारिप-बमसं, वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेले माजी आमदार बळीराम सिरस्कार यांना भविष्यातील राजकारणासाठी कुठे अधिक संधी उपलब्ध आहेत, याचा ताळेबंद पाहता त्यांचा कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे आता पुढे येत आहे. बाळापूर मतदारसंघात काँग्रेसकडे दोन प्रबळ उमेदवार असल्याने त्या पक्षात त्यांच्यासाठी काही करता येण्यासारखे नसल्याने त्यांनी पुढील दिशा बदलल्याचे संकेत आहेत.वंचित बहुजन आघाडीमधून माजी आमदार भदे बाहेर पडले. राजकारणातील पुढील भवितव्य ठरवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक साधत पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी भेट नियोजित केली आहे. त्याचवेळी माजी आमदार सिरस्कार यांचे तळ््यात-मळ््यात सुरू होते. भदे यांनीही त्यांच्या वाटचालीबद्दल काही सांगण्यास नकार दिला होता. त्यांचा निर्णय काय होईल, हे अनिश्चित असताना ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली; मात्र पुढील राजकीय भवितव्य काय, याचा विचार करता काँग्रेसमध्ये त्यांना जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या मूळ बाळापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये दोन प्रबळ दावेदार आहेत. त्यामध्ये अ‍ॅड. नातिकोद्दीन खतीब, तर माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, त्यांचे पुत्र प्रकाश तायडेही सक्रिय आहेत. त्यामुळे या दोन दावेदारांना डावलून काँग्रेसमध्ये त्यांना काही मिळेल, हा आशावाद फोल ठरू शकतो. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची शक्यता गृहीत धरल्यास बाळापूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आहे. या मतदारसंघात उमेदवारी केलेले संग्राम गावंडे मतदारसंघाबाहेरचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यास या मतदारसंघात संधी मिळू शकते, अशी अपेक्षा त्यांना वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेसचा पर्याय वगळून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता बळावली आहे.

 

टॅग्स :Baliram Siraskarबळीराम सिरस्कारNCPराष्ट्रवादी काँग्रेसbalapur-acबाळापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAkolaअकोलाPoliticsराजकारण