पीडीकेव्हीच्या कार्यकारी परिषदेवर बाजोरिया

By Admin | Updated: September 4, 2014 01:34 IST2014-09-04T01:33:48+5:302014-09-04T01:34:09+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर बाजोरिया यांची नियुक्ती.

Bajoria on the Executive Council of PDKV | पीडीकेव्हीच्या कार्यकारी परिषदेवर बाजोरिया

पीडीकेव्हीच्या कार्यकारी परिषदेवर बाजोरिया

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांची नियुक्ती करण्यात आली. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी मंगळवारी आमदार बाजोरिया यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.
पीडीकेव्हीच्या कार्यकारी परिषदेवरील रिक्त पदी विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात कृषी विभागाचे प्रधान सचिव, पीडीकेव्हीचे कुलसचिव यांना निर्देशित करण्यात आले आहे. आ. बाजोरिया यांची कार्यकारी परिषदेवरील नियुक्तीची मुदत १ जानेवारी २0१६ पर्यंत राहील. असे विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Web Title: Bajoria on the Executive Council of PDKV