शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘बाबूगिरी’ संपविण्यात आचारसंहितेची आडकाठी!

By admin | Updated: May 29, 2014 01:13 IST

बदलीस पात्र कर्मचार्‍यांची फाईलही तयार झाली होती. मात्र, अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामविकास मंत्रालयातर्फे या बदल्यांना स्थगिती देण्यात आली.

अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सोयीच्या टेबलांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची ह्यबाबूगिरीह्ण संपविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी बदलीस पात्र कर्मचार्‍यांची फाईलही तयार झाली होती. मात्र, अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामविकास मंत्रालयातर्फे या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. असे असले तरी मुंबईत मंत्रालयामध्ये मात्र बदली प्रक्रिया सुरूच आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांच्या बदलीचे धोरण शासनाने निश्‍चित केले आहे. त्यानुसार दरवर्षी बदलीस पात्र कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात येतात. असे असले तरी काही कर्मचारी त्यातून पळवाट काढीत एकाच टेबलवर वर्षानुवर्षांपासून काम करताना दिसत आहेत. अशा कर्मचार्‍यांपैकी ज्यांना एकाच टेबलवर तीन वर्षे व एका कार्यालयात पाच वर्षे झाली, अशांची बदली करण्याचे धोरण अकोला जिल्हा परिषद प्रशासनाने राबविले होते. त्याला आता ग्रामविकास मंत्रालयाने २२ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे कर्मचार्‍यांची बदली करावी किंवा नाही, याबाबत विचारणा झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे शासनाने पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले आहे. निवडणूक आयोगाकडून जोपर्यंत कोणतीही सूचना येत नाही, तोपर्यंत बदल्या किंवा बदलीसाठी कर्मचार्‍यांचे समुपदेशन स्थगित ठेवण्यात यावे, असे आदेश शासनाने दिले आहेत.