शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

साहाय्यक पोलीस निरीक्षक लाच स्वीकारताना गजाआड

By admin | Updated: December 23, 2014 00:49 IST

१९५00 रुपयांच्या लाचेची रक्कम केली गायब.

अकोला: अपघातातील जप्त केलेला ट्रक सुपूर्दनाम्यावर सोडविण्यास न्यायालयात सकारात्मक पोलीस अहवाल सादर करण्यासाठी २0 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बाळापूर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली. १६ नोव्हेंबर रोजी एमएच ३१ सीक्यू ७६७९ क्रमांकाचा ट्रक गुजरातवरून रसायनाचे ड्रम भरून नागपूरकडे जात असता, ट्रकचा पारसजवळील अंबुजा ऑइल फॅक्टरीजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकचालक राहुल उत्तम वाघमारे (रा. नागपूर) हा गंभीर जखमी झाला होता. बाळापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास एपीआय एकनाथ ढोबळे यांच्याकडे दिला. पोलिसांनी ट्रक जप्त केला. नागपूरच्या ट्रकमालकाने ट्रक सुपूर्दनाम्यावर सोडविण्यासाठी एपीआय ढोबळे यांना विनंती केली; परंतु ढोबळे यांनी न्यायालयामध्ये पोलीस अहवाल पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. ८ डिसेंबर रोजी ट्रकमालक व एपीआय ढोबळे यांच्यात १३ हजार रुपयांमध्ये तडजोड झाली आणि ट्रक सोडून दिला. काही दिवसांनंतर ट्रकचालक राहुल वाघमारेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एपीआय ढोबळे यांनी ३0४ अ नुसार गुन्हा दाखल केला आणि नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यात ट्रक पुन्हा जप्त केला. त्यानंतर एपीआय ढोबळे यांनी ट्रकमालकाडे ट्रक सोडण्यासाठी पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी केली. दोघांमध्ये १७ हजार रुपयांची तडजोड झाली. दरम्यान, ट्रकमालकाने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाळापूर पोलीस ठाण्यात सापळा रचला. ट्रकमालक बाळापूर पोलीस ठाण्यात १७ हजार रुपये घेऊन गेले असता, एपीआय ढोबळे यांनी त्याला २0 हजार रुपयांचीच मागणी केल्याने ट्रकमालकाने २0 हजार रुपये दिले. दबा धरून बसलेले एसीबीचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव, पोलीस निरीक्षक मनीष मोहोड, सुनील राऊत, सुनील धामोडे, संतोष दहीहांडे यांनी ढोबळे यांना अटक केली.