अकोला जिल्ह्यात विधानसभेचे वारे

By Admin | Updated: July 13, 2014 01:00 IST2014-07-13T01:00:36+5:302014-07-13T01:00:36+5:30

काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांचा दौरा

Assembly elections in Akola district | अकोला जिल्ह्यात विधानसभेचे वारे

अकोला जिल्ह्यात विधानसभेचे वारे

अकोला - विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील महिन्यात कोणत्याही क्षणी होऊ शकते. हे गृहित धरून राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी जोमाने सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक रविवारी अकोला दौर्‍यावर आले. दुसरीकडे काँग्रेसचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी ब्लॉक निरीक्षकांची नियुक्ती करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठय़ा अपयशाचा सामना करावा लागला. त्यावेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती नको म्हणून दोन्ही पक्ष विधानसभेसाठी आतापासूनच कामाला लागले असल्याचे दिसून येते. काँग्रेसने नियुक्त केलेले केंद्रीय निरीक्षक अब्दुल मन्नान हे १३ आणि १४ जुलै रोजी अकोला जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यात ते विधानसभानिहाय आढावा घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसचा मित्र पक्ष राष्ट्रवादीनेही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यभर जिल्हानिहाय निर्धार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. त्यापूर्वीच पक्षाचे ब्लॉक निरीक्षकांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील यांनी केली आहे. आकोट शहरासाठी राजेश देशमुख, आकोट तालुक्यासाठी अरविंद घोगरे, तेल्हारा शहरासाठी राजकुमार मंगळे, तालुक्यासाठी विजयसिंह सोळंके, बाळापूर शहर डॉ. नरेंद्र घोम, तालुका भास्कर चव्हाण, पातूर शहर मिलिंद जाधव, तालुका प्रा. मोहम्मद अली, बाश्रीटाकळी शहर सुनील पवार, तालुका निजामोद्दीन बदरोद्दीन, मूर्तिजापूर शहर प्रा. सदाशिव शेळके, तालुका प्रा. विजय उजवणे, अकोला उत्तरपूर्व मनोहर पाटील आणि अकोला दक्षिण पूर्व ब्लॉकसाठी गजानन पोहरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्षांनी सांगितले.

Web Title: Assembly elections in Akola district