शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांनी दलित, मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केले! - नितीन गडकरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:28 IST

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित व मुस्लीम समाजात भाजपबद्दल भीती व संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याचे टीकास्त्र केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी सोडले.

अकोला: मागील पाच वर्षांत भाजप सरकारने देशातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. त्याचा लाभ गोरगरीब कुटुंबांना होत असून, कोणतीही योजना अमूक एका जाती समूहासाठी नसून, ती सर्वांसाठी असल्याचे सिद्ध झाले आहे. नेमकी हीच बाब विरोधकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित व मुस्लीम समाजात भाजपबद्दल भीती व संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याचे टीकास्त्र केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी सोडले. वाडेगाव येथे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या जाहीर सभेत नितीन गडकरी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचित बहुजन आघाडीचा खरपूस समाचार घेतला.तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात सिंचन प्रकल्पांवर कोट्यवधींचा खर्च करूनही प्रकल्प अर्धवट होते. प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून अक्षरश: दहा टक्के दराने कमिशन उकळण्यात आले. २०१४ मध्ये राज्यात सत्तापरिवर्तन होताच भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पाचे काम बंद करण्याचे पातक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी खा.संजय धोत्रे यांची तळमळ दिसून आली. त्यावेळी त्यांना कोट्यवधींचा निधी दिला. या प्रकल्पांचा फायदा अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यातील शेतकºयांना वीज कनेक्शन, सब स्टेशन, रोहित्रांचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याचे काम भाजप-सेना सरकारने केले. केंद्र सरकारने योजनांचा लाभ देताना जातीपातीचे राजकारण केले नाही. ही विरोधकांची पोटदुखी असून, आजही त्यांचा आपसात मेळ नाही. देशाला स्थिर सरकार देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर खा.अ‍ॅड.संजय धोत्रे यांच्यासह भाजप-सेनेचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Gadkariनितीन गडकरीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरakola-pcअकोला