निवडणूक कामात हलगर्जी; अव्वल कारकून निलंबित

By Admin | Updated: February 19, 2017 02:10 IST2017-02-19T02:10:55+5:302017-02-19T02:10:55+5:30

निवडणूक निर्णय अधिका-यांचा आदेश

All the workers of the election campaign; Top clerks suspended | निवडणूक कामात हलगर्जी; अव्वल कारकून निलंबित

निवडणूक कामात हलगर्जी; अव्वल कारकून निलंबित

मलकापूर, दि. १८- निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पूर्ण न करता हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल अव्वल कारकून जी.पी. गवई यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. दिनेशचंद्र वानखेडे यांनी निलंबित केले.
जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी मलकापूर यांनी अधिकारी/कर्मचारी यांची चमूनिहाय नियुक्ती केली होती.
अव्वल कारकून जी.पी. गवई (मंडळ अधिकारी संवर्ग) तहसील कार्यालय मलकापूर यांच्याकडे मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व उमेदवार प्रतिनिधींसह इतरांच्या पासेस देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत तसेच वरिष्ठांचा आदेश न मानून निवडणूक कामात हलगर्जी केल्याप्रकरणी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.दिनेशचंद्र वानखेडे यांनी १५ फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशान्वये जी.पी. गवई यांना निलंबित केले असून, निलंबन काळात त्यांना मुख्यालय म्हणून नांदुरा तहसील कार्यालय देण्यात आले आहे.
गवई या अगोदर दाताळा येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होते.

Web Title: All the workers of the election campaign; Top clerks suspended